GT vs PBKS IPL 2022: हार्दिक पंड्याने जिंकला टॉस, फलंदाजीचा निर्णय

| Updated on: May 03, 2022 | 7:25 PM

संघात चांगले खेळाडू असूनही पंजाब किंग्सचा विजयासाठी संघर्ष सुरु आहे. पंजाबचा संघ 9 पैकी फक्त चार सामने जिंकला आहे.

GT vs PBKS IPL 2022: हार्दिक पंड्याने जिंकला टॉस, फलंदाजीचा निर्णय
GT vs PBKS
Follow us on

मुंबई: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये (GT vs PBKS) आज आयपीएलमधला 48 वा सामना होत आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर ही मॅच होत आहे. हार्दिक पंड्याने (Hardik pandya) टॉस जिंकला आहे. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. आतापर्यंत नऊ पैकी आठ सामने त्यांनी जिंकले आहेत. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सची स्थिती तशीच आहे, जशी प्रत्येक सीजनमध्ये असते.

संघात चांगले खेळाडू असूनही पंजाब किंग्सचा विजयासाठी संघर्ष सुरु आहे. पंजाबचा संघ 9 पैकी फक्त चार सामने जिंकला आहे. आयपीएलचा हा दुसरा टप्पा आहे. या सीजनमधला पहिला सामना दोन्ही संघांमध्ये झाला आहे. राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूंवर पंजाब किंग्सकडून विजयाचा घास हिरावला होता.

गुजरात टायटन्सची Playing – 11
हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदीमान सहा, शुभमन गिल, डेविड मिलर, राहुल तेवतिया, साई सुदर्शन, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्गुयसन, प्रदीप सांगवान आणि मोहम्मद शामी

गुजरातने मागच्या सामन्यात बँगलोरला हरवणाऱ्या 11 खेळाडूंवर विश्वास कायम राखला आहे. प्रदीप सांगवान चांगली कामगिरी केल्यामुळे दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली आहे.

पंजाब किंग्सची Playing – 11
मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षा, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह आणि संदीप शर्मा

लखनौ सुपर जायंट्सकडून पराभूत झाल्यानंतरही पंजाब किंग्सने आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. फलंदाज पूर्ण क्षमतेने आज आपला खेळ दाखवतील, अशी पंजाबला अपेक्षा आहे.