GT vs RR IPL 2022 Final Match Preview: आता ‘चॅम्पियनशिप’साठी फायनल लढाई, जो सर्वोत्तम तोच विजेता

| Updated on: May 28, 2022 | 3:34 PM

दोन महिने सुरु असलेल्या IPL 2022 स्पर्धेतील आता फक्त शेवटचा सामना बाकी आहे. 73 सामन्यानंतर फायनलचे दोन संघ निश्चित झाले आहेत. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) महामुकाबला रंगणार आहे.

GT vs RR IPL 2022 Final Match Preview: आता चॅम्पियनशिपसाठी फायनल लढाई, जो सर्वोत्तम तोच विजेता
Follow us on

मुंबई: दोन महिने सुरु असलेल्या IPL 2022 स्पर्धेतील आता फक्त शेवटचा सामना बाकी आहे. 73 सामन्यानंतर फायनलचे दोन संघ निश्चित झाले आहेत. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) महामुकाबला रंगणार आहे. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करुन पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (GT vs RR) अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलच्या उद्घाटनाच्या सीजनमध्ये विजेतेपद मिळवणारा गुजरात टायटन्सचा संघ पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. गुजरात टायटन्सच्या टीमने, तर आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्येच धमाका केला आहे. या सीजनमध्ये गुजरातच्या टीमने डेब्यु केला. ते थेट फायनलमध्ये धडक मारतील, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. दोन महिन्यांपूर्वी सीजन सुरु झाला, त्यावेळी संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या फायनल टॉससाठी मैदानावर उतरतील. मेगा ऑक्शननंतर या दोन टीम्सना क्रिकेटच्या अनेक जाणकारांनी पसंती दिली नव्हती. पण आज त्यांनी आपल्या परफॉर्मन्सने सर्वच टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.

फिनिशरची भूमिका चोख बजावली

हार्दिक पंड्या, राशिद खान, राहुल तेवतिया, डेविड मिलर आणि मोहम्मद शमी हे गुजरातच्या टीमचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. हार्दिक पंड्याने प्रत्येक सामन्यात जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेऊन डावाला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. राशिद खानने ज्या सामन्यात बॉलने शक्य झालं नाही, तिथे बॅटने योगदान दिलं. राहुल तेवतिया आणि डेविड मिलर या दोघांनी फिनिशरची भूमिका चोख बजावली. दोघांनी शेवटच्या एक-दोन चेंडूंवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद शमीने प्रारंभीच्या षटकात बॉल स्विंग होत असताना विकेट काढल्या. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात गुजरातचा संघ संतुलित वाटला.

फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात संतुलित

राजस्थान रॉयल्सला शेन वॉर्नसाठी किताब जिंकायचा आहे. काही महिन्यांपूर्वी शेन वॉर्नच निधन झालं. राजस्थानचं आयपीएल विजेतेपद ही शेन वॉर्नसाठी योग्य श्रद्धांजली ठरेल. राजस्थानच्या टीममध्ये युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन आणि जोस बटलरसारखे दिग्गज खेळाडू आहेत. ज्यांनी संजूपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त क्रिकेट खेळलय. पण संजूने या सर्व दिग्गजांना सोबत घेऊ टीम म्हणून यशस्वी बांधणी केली आहे. राजस्थानची टीम फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात संतुलित आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.