मुंबई: IPL 2022 मध्ये आजपासून प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या दोन टीम्स गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (GT vs RR) आज पहिला सामना होत आहे. आता लढाई फक्त 2 पॉइंट्सची नाहीय, तर निर्णायक असेल. फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी दोन संघ भिडतील. आज आयपीएल 2022 मध्ये क्वालिफायरचा पहिला सामना होत आहे. दोन्ही संघांकडे उत्तम खेळाडू आहेत, ज्यांच्या बळावर दोन्ही टीम्स इथवर पोहोचल्या आहेत. आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या गुजरात टायटन्सने धमाकेदार प्रदर्शन केलं. पहिल्याच सीजनमध्ये थेट प्लेऑफमध्ये धडक मारली. हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली या टीमने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. गुजरातचा संघ अजिंक्य वाटत असला, तरी त्यांच्याही काही कमतरता आहेत. ज्या त्यांना महाग पडू शकतात.
गुजरातला सलामीवीरांच्या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. प्रत्येक सामन्यात अशी सुरुवात मिळालेली नाही. सलामीवीर म्हणून शुभमन गिलच्या कामगिरीत सातत्य नाहीय. मात्र तरीही सलामीवीर म्हणून तोच मैदानात उतरेल. ऋदिमान साहा त्याच्यासोबत मैदानात येईल. तिसऱ्या क्रमांकावर कोण येणार? ही त्यांच्यासमोरची मुख्य समस्या आहे. त्या स्थानावर वेगवेगळ्या फलंदाजांना संधी दिली आहे. मॅथ्यू वेडला अखेरची संधी मिळू शकते.
मधल्याफळीचं टेन्शन नाहीय. गोलंदाजांचं स्थानही पक्क आहे. फक्त लॉकी फर्ग्युसन आणि अल्जारी जोसेफ या दोघांमध्ये कोणाला खेळवायचं? यावर निर्णय होणं बाकी आहे. दोघेही परदेशी वेगवान गोलंदाज आहेत. पण त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसलेलं नाही. अशा परिस्थितीत कोणाला संधी मिळते? ते महत्त्वाचं ठरणार आहे.
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेवन एकदम सेट आहे. जोस बटलरला मागच्या काही सामन्यात चांगल्या धावा करता आलेल्या नाहीत. मात्र यशस्वी जैस्वाल सोबत त्याने चांगली सुरुवात दिली आहे. आज कॅप्टन संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गुजरात प्रमाणे राजस्थानचा मिडल ऑर्डरही सेट आहे. शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन आपल्या बाजून चांगलं योगदान देत आहेत.
गुजरात प्रमाणे राजस्थान समोरही पाचव्या गोलंदाजाचा प्रश्न आहे. ट्रेंट बोल्ड, प्रसिद्ध कृष्णाला कुलदीप सेनने चांगली साथ दिली आहे. मागच्या दोन सामन्यात ओबेड मॅकॉयला संधी मिळाली आहे. त्याने पण चांगलं प्रदर्शन केलं आहे. यात आता प्लेइंग 11 मध्ये कोणाची निवड होते? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
GT vs RR संभाव्य प्लेइंग 11
गुजरात – हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, ऋदिमान साहा, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी आणि यश दयाल,
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मेकॉय,