सच्चे क्रिकेटप्रेमी आहात ना? मग आईच्या कुशीत ऐटीत बसलेला हा आघाडीचा क्रिकेटपटू कोण?; ओळखून दाखवाच

| Updated on: Apr 13, 2023 | 6:27 AM

प्रसिद्ध क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहने त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. आईच्या कुशीत बसलेला हा त्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. फोटोला प्रचंड लाइक्स मिळत आहे.

सच्चे क्रिकेटप्रेमी आहात ना? मग आईच्या कुशीत ऐटीत बसलेला हा आघाडीचा क्रिकेटपटू कोण?; ओळखून दाखवाच
Jasprit Bumrah
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : भारतात प्रत्येक नाक्यावर, गल्लीत आणि शहरात तुम्हाला उत्तमोत्तम क्रिकेटपटू, क्रिकेटचे चाहते तुम्हाला भेटतील. टीम इंडियाने नुसते क्रिकेटप्रेमी निर्माण केले नाहीत तर क्रिकेटपटू घडवलेही आहेत. त्यामुळेच आजही देशातील आघाडीच्या आणि महान खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाबाबत जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. काही क्रिकेटवेड्यांनी तर आपल्या आवडत्या खेळाडूंच्या फोटोंचा संग्रहच तयार केला आहे. त्यात लहानपणापासून ते आतापर्यंतचे फोटो आहेत. आमच्या हातीही असाच एका आघाडीच्या खेळाडूचा फोटो लागला. आईच्या कुशीत बसलेला हा क्रिकेटपटू ओळखणं कठिणच आहे.

आईच्या कुशीत बसलेला हा क्रिकेटपटू बालपणी अत्यंत सुंदर आणि मोहक असल्याचं दिसून येतो. हाच गोंडस मुलगा पुढे चालून क्रिकेट जगतावर हुकूमत गाजवतानाच देशाचा नावलौकिक वाढवेल असं कुणालाही वाटलं नसेल. हा क्रिकेटपटू गुजरातचा आहे. गुजरातने देशाला अनेक मोठे क्रिकेटपटू दिले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज दिलं आहे. याच गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम असं या स्टेडियमचं नाव आहे.

हे सुद्धा वाचा

बुमराह जखमी

फोटोतील या मुलाचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून भारतातील सर्वश्रेष्ठ पेसर जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने सोशल मीडियावर आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.सध्या बुमराह जखमी झालेला आहे आणि उपचार घेत आहे. कारण याच वर्षी आयसीसी वनडे विश्वचषक सामना होणार आहेत. त्यासाठी फिट राहता यावं म्हणून बुमराह उपचार घेत आहे.

संजनाशी विवाह

बुमराह विवाहीत आहे. 15 मार्च 2021 रोजी मॉडल आणि प्रेझेंटर संजना गणेशनशी त्याने विवाह केला आहे. गोव्यात दोघांचा विवाह झाला होता. संजना गणेशन ही महाराष्ट्रीयन असून पुण्याची आहे. तसेच मिस इंडिया फायलनपर्यंतही ती जाऊन आलेली आहे.

असं आहे करिअर

2016मध्ये बुमराहने आपलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर सुरू केलं होतं. सुरुवातीला तो गुजरातकडून खेळत होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्याने 30 टेस्ट मॅचमध्ये 128 विकेट घेतले आहेत. 70 एकदिवसीय सामन्यात 119 बळी टिपले आहेत. तसेच 57 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 67 विकेट घेतले आहेत. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.