GT vs CSK IPL2023 : आयपीएल 2023 च्या सीजनची सुरुवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सीजनमधला पहिला सामना झाला. मागच्या सीजनमध्ये जसा निकाल लागला होता, तेच चित्र आताही कायम राहिलं. मागच्या सीजनमध्ये गुजरातच्या टीमने चेन्नई विरुद्ध दोन्ही सामने जिंकले होते. आताची तीच स्थिती आहे. गुजरातने चेन्नई विरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक केली.
गुजरातने लास्ट ओव्हरमध्ये चेन्नईवर विजय मिळवला. हार्दिक पंड्याच्या टीमने चेन्नईला 5 विकेटने हरवलं. सामना संपल्यानंतर धोनीने एका गोष्टीबद्दल दु:ख व्यक्त केलं. क्रिकेटच्या T20 फॉर्मेटमध्ये ती चूक गुन्ह्यासमान समजली जाते.
चेन्नई विरुद्ध तीन्ही सामने लास्ट ओव्हरपर्यंत
मागच्या सीजनमध्ये गुजरातने डेब्यु केला. त्यावेळी दोन्ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत चालल्या होत्या. कॅप्टन कुलची रणनिती सुद्धा चेन्नईचा पराभव टाळू शकली नव्हती. यावेळी सुद्धा असंच झालं. शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातने चेन्नईची विजयाची संधी हिरावली.
धोनी कुठल्या चुकीवर नाराज झाला
या मॅचमध्ये चेन्नईच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारण्याची संधी गमावली. कॅप्टन धोनीने ही कमतरता मान्य केली. धोनी गोलंदाजांच्या एका चुकीवर जास्त नाराज झाला. कारण अशा चूकांमुळे मॅचची दिशा बदलते. ही चूक होती नो-बॉलची. धोनीने पराभवानंतर त्याचा उल्लेख केला. अशा चूका टाळल्या पाहिजेत, कारण या गोष्टी गोलंदाजाच्या नियंत्रणात असतात. चेन्नई टीमने या मॅचमध्ये 2 नो-बॉल टाकले. त्यावर 14 धावा आल्या.
दोन फ्रि हिट कसे महाग पडले?
आयपीएलमध्ये आपली पहिलीच ओव्हर टाकणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने पहिला नो-बॉल टाकला. त्यानंतर फ्री हिटवर फलंदाजाला मोठा फटका खेळता येऊ नये, या नादात वाइड बॉल टाकला त्यामुळे फ्री हिट कायम राहिला. बॅट्समनने चौकार मारला. म्हणजे एका चेंडूत 6 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये तृषार देशपांडेने नो-बॉल टाकला. ज्यावर 1 धाव मिळाली होती. त्यानंतर शुभमन गिलने फ्रि हिटवर सिक्स मारला. म्हणजे 8 अतिरिक्त रन्स गेल्या. अशा प्रकारे CSK ला 2 चेंडूत 14 धावांचा फटका बसला.
त्या तुलनेत गुजरातकडून मोहम्मद शमीने फक्त एक नो-बॉल टाकला. पण त्यानंतर फ्रि-हिटवर चौकार किंवा षटकार गेला नाही. त्यामुळे धोनी नाराज होणं स्वाभाविक आहे.