GT vs MI 2023 Playing 11 : गुजरात विरुद्ध जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला काय चूका सुधाराव्या लागतील?

| Updated on: Apr 25, 2023 | 8:26 AM

GT vs MI 2023 Playing 11 : पहिल्या दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या टीमने सलग तीन सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं होतं. पण त्यानंतर मुंबईला पराभवाचा झटका बसला. आता प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला विजय मिळवावा लागेल.

GT vs MI 2023 Playing 11 : गुजरात विरुद्ध जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला काय चूका सुधाराव्या लागतील?
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला.
Follow us on

GT vs MI 2023 Playing 11 : गतविजेते गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये आज इंडियन प्रीमियर लीगमधील 35 वा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. या सीजनमध्ये दोन्ही टीम्स सहा सामने खेळल्या आहेत. गुजरातच्या टीमने चार, तर मुंबईच्या टीमने तीन सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सने पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केली होती. पण केकेआर विरुद्ध तिसऱ्या सामन्यात रिंकू सिंहने त्यांचं विजयाच गणित बिघडवलं.

त्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध उसळून उठण्याचा प्रयत्न केला. पण थोडक्यात त्यांचा पराभव झाला. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला. या मॅचमध्ये गुजरातने खूप कमी धावा केल्या होत्या.

हार्दिकची सीजनमधली पहिली हाफ सेंच्युरी

20 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या टीमने सहा विकेट गमावून फक्त 135 धावा केल्या होत्या. हार्दिक पंड्याने सीजनमधील पहिली हाफ सेंच्युरी झळकवली. वृद्धीमान साहासोबत दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. साहाने 37 चेंडूत 47 धावा केल्या होत्या.

7 धावांनी निसटता पराभव

लखनौ सुपर जायंट्सने धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. 15 ओव्हरमध्ये त्यांच्या 106 धावा झाल्या होत्या. पण नंतरच्या चार ओव्हरमध्ये फक्त 18 धावा केल्या. लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज होती. पण त्यांचा 7 धावांनी निसटता पराभव झाला.

कमबॅकनंतर मुंबईचा पराभव

मुंबई इंडियन्सची या सीजनमध्ये खराब सुरुवात झाली. पहिले दोन सामने त्यांनी गमावले. पण नंतरच्या तीन सामन्यात त्यांनी जोरदार कमबॅक केलं. पंजाब किंग्स विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. पंजाब किंग्सने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. 20 ओव्हर्समध्ये त्यांनी 214 धावा ठोकल्या. पाचव्या विकेटसाठी सॅम करन आणि हरप्रीत सिंहमध्ये 92 धावांची भागीदारी झाली.

मुंबईकडून तिघे खेळले

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट गमावला. त्यानंतर रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीनने दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवसोबत 75 धावा जोडल्या. मुंबईकडून ग्रीनने सर्वाधिक 67, सूर्यकुमारने 57 आणि रोहितने 44 धावा केल्या. मुंबईचा फक्त 13 धावांनी पराभव झाला.

पंजाब विरुद्ध मुंबईच काय चुकलं?

पंजाब विरुद्धच्या सामन्यात 15 व्या ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सच्या हातून सामना निसटला. मुंबईच्या गोलंदाजांवर सॅम करन 29 चेंडूत (55) आणि जितेश शर्मा 7 चेंडूत (25) धावा यांनी हल्लाबोल केला. अर्जुन तेंडुलकरच्या 3 ओव्हरमध्ये 48 धावा, जोफ्रा आर्चरच्या 4 ओव्हरमध्ये 42 धावा कुटल्या. त्यामुळे गुजरात विरुद्ध विजय मिळवण्यासाठी मुंबईच्या गोलंदाजांना अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी करावी लागेल.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11

शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कॅप्टन), अभिनव मनोहर, डेविड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, वृद्धीमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शामी, एमएम शर्मा, नूर अहमद

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, टिम डेविड, तिलक वर्मा, एच शौकीन, कॅमरुन ग्रीन, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, इशान किशन (विकेटकीपर), जेपी बेहरनडॉर्फ, जोफ्रा आर्चर,