GT vs RCB, IPL 2022 Toss update: फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकला, RCB ची पहिली बॅटिंग

| Updated on: Apr 30, 2022 | 3:20 PM

GT vs RCB, IPL 2022 Toss update: विराट कोहलीचा फॉर्म हा RCB साठी चिंतेचा विषय आहे. मागच्या काही सामन्यांपासून विराट सातत्याने अपयशी ठरतोय. वनडाऊन येणारा विराट ओपनिंगला सुद्धा आला, पण त्याने विशेष काही फरक पडला नाही.

GT vs RCB, IPL 2022 Toss update: फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकला, RCB ची पहिली बॅटिंग
GT vs RCB
Follow us on

GT vs RCB, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) आज डबल हेडरचे सामने आहेत. म्हणजे एकाच दिवशी दोन मॅच. गुजरात टायटन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (GT vs RCB) विरुद्ध सामना होत आहे. गुजरात टायटन्सच नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (Hardik pandya) आहे तर RCB ची कॅप्टनशिप फाफ डू प्लेसिसकडे आहे. स्पर्धेचा आता दुसरा टप्पा सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला होता. गुजरातने हैदराबादच्या तोंडातून विजय खेचून आणला होता. तेच मागच्या सामन्यात आरसीबीचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला होता. पॉइंटस टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. आठ पैकी सात सामने त्यांनी जिंकले असून एका मॅचमध्ये पराभव झाला आहे. RCB चा संघ पाचव्या स्थानावर आहे. नऊ पैकी पाच सामने जिंकले असून चार सामन्यात पराभव झाला आहे.

गुजरात टायटन्सच्या संघात आज दोन बदल

गुजरात टायटन्सच्या संघात आज दोन बदल आहेत. यश दयाल आणि अभिनव मनोहरच्या जागी प्रदीप सांगवान आणि साई सुदर्शन या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पंड्या आज आयपीएलमधला आपला 100 वा सामना खेळतोय.

विराट आज तरी धावा करणार?

विराट कोहलीचा फॉर्म हा RCB साठी चिंतेचा विषय आहे. मागच्या काही सामन्यांपासून विराट सातत्याने अपयशी ठरतोय. वनडाऊन येणारा विराट ओपनिंगला सुद्धा आला, पण त्याने विशेष काही फरक पडला नाही. परिस्थिति जैसे थे आहे. आरसीबीच्या विजयासाठी विराटची बॅट चालणं सुद्धा तितकीच आवश्यक आहे. मागच्या काही सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळणं आवश्यक आहे.

अशी आहे RCB ची प्लेइंग- 11

फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शहाबाज अहमद, माहीपाल लॉमरॉर, दिनेश कार्तिक, वानिंन्दु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड,

अशी आहे गुजरात टायटन्सची प्लेइंग- 11

हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, वृद्धीमान सहा, साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप सांगवान, अलझारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी,