GT vs SRH, IPL 2022: गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही टीम्सची Playing -11

| Updated on: Apr 27, 2022 | 7:22 PM

GT vs SRH, IPL 2022: सनरायजर्स हैदराबादने सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. सलग पाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. सतत विजयाची सवय जडलेले हे दोन संघ भिडत आहेत.

GT vs SRH, IPL 2022: गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही टीम्सची Playing -11
GT vs SRH
Follow us on

GT vs SRH, IPL 2022: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा केन विलियमसनच्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध (GT vs SRH) आज सामना होत आहे. हार्दिक पंड्याने टॉस जिंकला असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. आयपीएलमध्ये डेब्यु करणाऱ्या गुजरात टायटन्सने सात सामने खेळले आहेत. ज्यात सहा सामन्यात विजय मिळवला आहे. सनरायजर्स हैदराबादने सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. सलग पाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. सतत विजयाची सवय जडलेले हे दोन संघ भिडत आहेत. त्यामुळे एका संघाचा पराभव निश्चित आहे. दोन्ही टीम्सच्या कामगिरीत सातत्य आहे. गुजरातचा एकमेव पराभव सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध झाला आहे. त्यामुळे गुजरातची टीम आज त्या पराभवाचा वचपा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.

वॉशिंग्टन सुंदरच कमबॅक

वॉशिंग्टन सुंदरने आज कमबॅक केलं आहे. त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. जे.सुचितच्या जागी तो खेळणार आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या कमबॅकने हैदराबादची ताकत वाढणार आहे. कारण ऑफ स्पिन फिरकी गोलंदाजी बरोबर तो चांगली फलंदाजीही करु शकतो. मोक्याच्याक्षणी गरज असताना, वॉशिंग्टन सुंदर उपयुक्त फलंदाजी करु शकतो.

दोन टीम्समध्ये कोणाची बाजू सरस ?

हैदराबाद आणि गुजरात दोन्ही टीम्सची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात या दोन टीम्सपैकी जो संघ चांगली फलंदाजी करेल, त्यांना विजयाची जास्त संधी असेल. फलंदाजीच्या बाबतीत हैदराबादचा संघ थोडा सरस वाटतोय. कारण केन विलियमसन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम आणि निकोलस पूरन हे सगळेच चांगली फलंदाजी करताय. त्या तुलनेत गुजरातकडून फक्त हार्दिक पंड्याच्या फलंदाजीत सातत्य दिसतय. शुभमन गिलचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. कारण मागच्या दोन-तीन सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी झालेली नाही.

अशी आहे गुजरात टायटन्सची Playing 11

हार्दिक पंड्या (कॅप्टन), वृद्धीमान सहा, शुभमन गिल, डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, अझलारी जोसेफ, लॉरी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल,

अशी आहे SRH ची Playing 11
केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅमसेन, उमरान मलिक, टी. नटराजन,