नवी दिल्ली: सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा नामरा कादिरवर एका उद्योजकाने गंभीर आरोप करुन खटला दाखल केलाय. नामरा आणि तिच्या नवऱ्यावर एका उद्योजकाला हनीट्रॅपमध्ये फसवल्याचा आरोप आहे. त्याचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले. त्यानंतर नामरा आणि तिच्या नवऱ्याने उद्योजकाला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून 80 लाख रुपये उकळले. नामरा कादिरने या प्रकरणात सोशल मीडियावरुन आपली बाजू स्पष्ट केलीय. गुरुग्राम पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी नामराला अटक केली. सध्या चार दिवसांचा रिमांड दिला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार नामरा कादिरचे यूट्यूबवर 6 लाख पेक्षा जास्त सब्सक्रायबर आहेत. इन्स्टाग्रामवर तिला 2 लाखपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
गुरुग्रामच्या बादशाहपूर येथे राहणाऱ्या एका उद्योजकाने नामरा कादिर आणि तिच्या पतीविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. नवऱ्यासोबत मिळून कादिरने आपल्याला हनीट्रॅपच्या जाळ्यात फसवलं, असा आरोप केला होता. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. उद्योजक गुरुग्राममध्ये इनफ्लूएंसर मीडिया फर्म चालवतो. त्यामुळे कादिरसोबत त्याची ओळख झाली.
तिघे एकाच रुममध्ये राहिले
एकदिवस नामरा कादिर आणि तिचा नवरा त्याला एका क्लबमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याला खूप दारु पाजली. त्यानंतर हॉटेलमध्ये रुम बुक करुन तिघे एकाच खोलीत राहिले. त्याच दिवसापासून नामरा आणि तिच्या नवऱ्याने आपल्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, असं उद्योजकाने सांगितलं.