Birthday Special : आधी हॉकी खेळायची, मग क्रिकेटपटू बनली, कमी वयात मोठी कामगिरी करणारी भारताची अफलातून क्रिकेटपटू
भारतीय महिला क्रिकेट संघातील ही खेळाडू मुंबई रहिवाशी आहे. आज म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी ती 21 वर्षांची झाली असून इतक्या कमी वयात तिने जागतिक क्रिकेटमध्ये आपलं नाव केलं आहे.
1 / 5
भारतीय महिला क्रिकेट संघातील युवा स्टार खेळाडू जेमिमा रोड्रिग्स (jemimah rodrigues) आज (5 सप्टेंबर) 21 वर्षांची होत आहे. महाराष्ट्रात 5 सप्टेंबर, 2000 रोजी जन्म झालेली जेमिमा कमी वयातच भारतीय संघात निवडली गेली. जेमिमा मैदानात एक विश्वासू फलंदाज असण्यासोबत मैदानाबाहेर संघातील एक सर्वात हसतमुख आणि सर्वांची लाडकी खेळा़डू आहे.
2 / 5
जेमिमाने स्थानिक क्रिकेटमध्येही बरच नाव कमावलं आहे. विशेष म्हणजे जेमिमा आधी क्रिकेटर बनणार नव्हती. तिला सगळेच खेळ आवडतं पण ती हॉकी खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळली होती. पण नंतर तिने क्रिकेटर होण्याचं ठरवलं आणि तिचे वडिल इवान रोड्रिग्सचं तिचे पहिले प्रशिक्षक बनले.
3 / 5
जेमिमाने स्थानिक क्रिकेटमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरवात केली. तिने मुंबई संघाकडून खेळताना सौराष्ट्र विरुद्ध दुहेरी शतक ठोकलं होतं.163 चेंडूत तिने 202 धावा केल्या होत्या. तिच्या आधी अशी कामगिरी करणारी स्मृति मांधना ही एकमेव भारतीय आहे.
4 / 5
जेमिमा रोड्रिग्सने 2018 साली श्रीलंका संघाविरुद्ध टी-20 मालिकेत सलग तीन षटकार ठोकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय क्रिकेटपटू ठरली होती.
5 / 5
जेमिमा क्रिकेटसह हॉकी आणि बास्केटबॉलही खेळते. तसंच खेळाशिवाय तिला संगीतही आवडतं. ती उत्तम गिटार वाजवत असून ती अनेक मनोरंजनात्मक व्हिडीओ आपल्य़ा सोशल मीडियावर टाकत असते.