Harbhajan Singh : ‘हो, बाकी 10 खेळाडू कुठे….’, धोनीच्या विषयावरुन हरभजन भिडला, WTC Final नंतर मोठा वाद

| Updated on: Jun 12, 2023 | 11:21 AM

Harbhajan Singh angry over Dhoni Fan : 10 वर्षानंतरही टीम इडिया विजेतेपदापासून दूर आहे. नेहमी असा मोठा पराभव होतो, तेव्हा टीम इंडियाच्या चाहत्यांना लगेच एमएस धोनीची आठवण येते.

Harbhajan Singh : हो, बाकी 10 खेळाडू कुठे...., धोनीच्या विषयावरुन हरभजन भिडला, WTC Final नंतर मोठा वाद
harbhajan singh -ms dhoni
Follow us on

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने खूपच खराब प्रदर्शन केलं. टीम इंडियाच्या या परफॉर्मन्सवर चाहत्यांच निराश होणं स्वाभाविक आहे. चाहते आता टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. 209 धावांनी मोठा पराभव झाला. भारताची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची मोठी संधी हुकली. 10 वर्षानंतरही टीम इडिया विजेतेपदापासून दूर आहे. नेहमी असा मोठा पराभव होतो, तेव्हा टीम इंडियाच्या चाहत्यांना लगेच एमएस धोनीची आठवण येते.

आताही तसच घडलं. WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर एक चाहत्याने धोनीबद्दल सांगितलं. कॅप्टनशिपची जबाबदारी संभाळल्यानंतर एमएस धोनीने 48 दिवसात टीमला ICC ट्रॉफी जिंकून दिली होती.

हरभजनला कुठल्या गोष्टीचा इतका राग आला?

एका चाहत्याने असं टि्वट करताच हरभजन सिंग लगेच भडकला. त्याने टि्वटच उत्तर टि्वटने दिलं. मात्र त्यानंतर हरभजनला सोशल मीडियावर मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हरभजन सिंगला कुठल्या गोष्टीचा इतका राग आला? ते समजून घ्या. टीम इंडियावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारं ते टि्वट होतं. हरभजनने आपल्या नेहमीच्या शैलीत त्याला उत्तर दिलं.


त्या टि्वटमध्ये काय म्हटलं होतं?

सर्वप्रथम हे टि्वट काय होतं? ते समजून घ्या. WTC Final मध्ये टीम इंडियाच्या मोठ्या पराभवानंतर एका फॅनने हे टि्वट केलं. “कोच नव्हता, मेंटॉर नव्हता, फक्त युवा खेळाडू होते. कारण सिनियर खेळाडूंनी नकार दिला होता. एकाही मॅचमध्ये कॅप्टनशिपचा अनुभव नाही. मात्र, तरीही धोनीने त्यावेळचा मजबूत संघ ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये हरवलं. कॅप्टनशिपची जबाबदारी स्वीकारल्यानंतर 48 दिवसात धोनीने हे करुन दाखवलं” असं त्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.


हरभजनने काय उत्तर दिलं?

त्या टि्वटला हरभजनने उत्तर दिलं. तो संतापला होता. “हा, का नाही, ज्यावेळी तो भारतासाठी खेळत होता, तेव्हा फक्त एक युवा मुलगाच खेळत होता. अन्य 10 प्लेयर नव्हतेच. त्याने एकट्यानेच सर्व वर्ल्ड कप ट्रॉ़फी जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया किंवा दुसरे देश वर्ल्ड कप जिंकतात, तेव्हा त्याचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं जातं. पण टीम इंडियाच्या विजयानंतर फक्त कॅप्टनचीच चर्चा होते. क्रिकेट एक टीम गेम आहे, ज्यात जय-पराजय एकत्र असतो” असं हरभजन सिंगने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.

भज्जीने जे म्हटलं, त्यात काही चुकीच नव्हतं. मात्र ते धोनीच्या फॅन्सना आवडलं नाही. त्यांनी सोशल मीडियावर हरभजनला ट्रोल करायला सुरुवात केली. कोणी त्याला तू धोनीवर जळतोस अस म्हटलं, तर काहींनी दुसरच सुनावलं.