hardik pandya net worth: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये कमाल केली. परंतु विश्वविजेतेपदानंतर त्याला एक, एक धक्के बसत आहे. गुरुवारी बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यात त्याचे उपकर्णधारपद काढण्यात आले. त्यानंतर हार्दिकची पत्नी नताशाने त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे. हार्दिकने सोशल मीडिया यासंदर्भात पोस्ट केली.
आयपीएल 2024 दरम्यान त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात मतभेद झाले होते. त्यासंदर्भातील बातम्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर येत होत्या. यामुळे नताशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हार्दिकसोबतचा कोणताही फोटो शेअर करत नव्हती. यामुळे दोघांमध्ये सुरळीत काहीच नसल्याचे स्पष्ट संकेत दिले जात होते. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (18 जुलै) रात्री हार्दिकने नताशासोबत घटस्फोटाच्या वृत्ताला सोशल मीडियातून दुजोरा दिला. घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याला त्याच्या कमाईतील 70 टक्के रक्कम नताशाला द्यावी लागू शकते.
हार्दिक पंड्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने सांगितले होते की, त्याचे घर आणि कार त्याच्या आईच्या नावावर आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक म्हणतो, ‘माझ्या वडिलांच्या खात्यात आईचे नाव आहे, भावाच्या खात्यात आईचे नाव आहे आणि माझ्या खात्यातही आईचे नाव आहे. सर्व काही तिच्या नावावर आहे. कारपासून घरापर्यंत…सगळं तिच्या नावावर आहे.
सन 2020 मध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्न केले होते. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या पद्धतीने लग्न केले होते. या सेलिब्रिटी कपल त्यावेळी खूप चर्चेत आले होते. चार वर्षांचे हे नाते आता संपुष्टात आले आहे. तसेच दोघे मिळून मुलगा अगस्त्यची जबाबदारी उचलणार आहे. नताशा घटस्फोटच्या निर्णयानंतर तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली आहे.