मुंबई: सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्समध्ये (SRH vs GT) आयपीएलमधला 40 वा सामना खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच सुरु आहे. आजच्या सामन्यात हार्दिक पंड्याला (Hardik pandya) पुन्हा एकदा उमरान मलिकचा (Umran Malik) बाऊन्सर चेंडू शेकला. पण हार्दिकने हार मानली नाही. या सीजनमध्ये हार्दिक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आपल्या कॅप्टनशिपने त्याने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत. हार्दिकच्या खेळात एक जबाबदारीची भावना दिसते. संघाला विजय मिळवून देण्याचा तो त्याच्यापरीने पूर्ण प्रयत्न करताना दिसतो. हार्दिकचा सध्याचा खेळ पाहून भविष्यात त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. फिटनेसबद्दल अजूनही काही प्रश्न आहेत. पण हार्दिकमध्ये अजून बरचं क्रिकेट शिल्लक आहे. तो संपलेला नाही. हेच यंदाच्या सीजनमध्ये दिसून आलय. हार्दिकची बॅट तळपतेय. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आहे. त्यामुळे हार्दिकडून अजून काही मॅचविनिंग इनिंग्स पहायला मिळू शकतात.
आधी बॉल शेकला मग हार्दिकने जे केलं ते…
आजच्या सामन्यात पुन्हा एकदा उमरान मलिक आणि हार्दिकचा आमना-सामना झाला. त्यावेळी उमराने मलिकने टाकेलला एका बाऊन्सर चेंडू त्याच्या उजव्या खांद्याला जोरात लागला. फिजियोने सुद्धा उपचार देण्यासाठी लगेच मैदानात धाव घेतली. प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेली हार्दिकची बायको नताशा हार्दिकला चेंडू शेकल्यानंतर लगेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते. पण हार्दिक लढवय्या आहे. दुसऱ्या चेंडूवर त्याने उमरान मलिकला जोरदार पंच मारुन चेंडू सीमापार पाठवला.
हार्दिकला बॉल शेकल्यानंतर अशी होती नताशाची Reaction
मागच्या सामन्यात उमरानने कानाजवळ हार्दिकला बॉल शेकवला होता
एसआरएच आणि गुजरात टायटन्सच्या पहिल्या सामन्यात आठव्या षटकात त्याचा सामना वेगवान गोलंदाज उमरान मलिक बरोबर झाला. उमरान त्याचं पहिलच षटक टाकत होता. या ओव्हरची सुरुवात ज्या पद्धतीने झाली, त्याची कल्पना हार्दिकनेही केली नसेल. उमरानने पहिलाच चेंडू शॉर्ट टाकला. या बॉलवर पुल शॉट खेळण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला. चेंडू थेट हेल्मेटच्या ग्रीलवर आदळला. या चेंडूने हार्दिकला चकवलं आणि एका लढतीची सुरुवात झाली.
— Vaishnavi Sawant (@VaishnaviS45) April 27, 2022
— Vaishnavi Sawant (@VaishnaviS45) April 27, 2022
बॉल लागल्यानंतर हार्दिकने स्वत:ला सावरलं व लगेच फलंदाजी सुरु केली. त्याने उमरानला बॅटनेच जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण दुसऱ्याच चेंडूवर हार्दिकने प्रतिहल्ला चढवला. चेंडूला कव्हर्सच्या दिशेने सीमापार धाडलं. उमरानने पुन्हा पुढचा चेंडू शॉर्ट टाकला. हार्दिक तयारच होता. त्याने यावेळी कोणतीही चूक न करता पुलचा फटका खेळून चेंडू सीमापार धाडला.