मुंबई: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पंड्या (Hardik pandya) यंदाच्या IPL मध्ये जलवा दाखवतोय. बॅटने चौफेर फटकेबाजी करुन तो खोऱ्याने धावा वसूल करतोय. गुजरात टायटन्सची टीमही पॉइंटस टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. पण असं सर्व असलं, तरी हार्दिक पंड्याच टीम इंडियामध्ये कमबॅक कठीण दिसतय. तुम्ही हे वाचून थोडे चक्रावून जालं. तुम्ही म्हणालं इतक्या धावा करतोय, मग टीम इंडियात निवड होणं मुश्किल का?. गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या आज आरसीबी विरुद्ध फिल्डिंग करत होता. त्यावेळी त्याच्या फिटनेसची पोल-खोल झाली. हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होतय. आरसीबी विरुद्ध हार्दिक पंड्या मिड ऑफला फिल्डिंग करत होता. त्याचवेळी विराट कोहलीने अल्जारी जोसेफच्या चेंडूवर कवर ड्राइव्ह मारला.
चेंडू पंड्याच्या जवळून गेला. तो चेंडूच्या मागे धावत होता. हार्दिक ज्या पद्धतीने पळत होता, ते पाहून तो फिट आहे, असं अजिबात वाटलं नाही. हार्दिक पंड्याला पळताना त्रास होत होता. तो जॉगिंग करतोय, असंच वाटत होतं. हार्दिक पंड्या अनफिट असूनही आयपीएल खेळतोय, हे स्पष्ट आहे.
हार्दिकने मागच्या तीन सामन्यांपासून गोलंदाजी केलेली नाही. शेवटची गोलंदाजी हार्दिकने 14 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात केली होती. केकेआर, सनरायजर्स हैदराबाद आणि आरसीबी विरुद्ध त्याने गोलंदाजी केली नाही. हार्दिक गुजरातसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 300 पेक्षा जास्त धावा केल्या असून यात तीन अर्धशतक आहेत. पण फिल्डिंग करताना त्याचा फिटनेस खूपच खराब आहे.
Hardik Pandya should not be considered for T20 WC if he can’t bowl. He has stopped bowling again, seems fitness issue. #RCBvsGT #IPL2022
— Divyanshu Garg (@divyanshu_garg_) April 30, 2022
हार्दिक यंदा आयपीएलमध्ये फलंदाजी करण्यासाठी वरती येतोय. त्याने 3 आणि 4 नंबरवर फलंदाजी केली आहे. टीम इंडिया हार्दिककडे फिनिशरच्या रोलमध्ये पहात आहे. आयपीएलचा सीजन संपल्यानंतर त्याला फिटनेस कसा असेल? हे कोणीही सांगू शकत नाही. स्पर्धेमध्ये हार्दिक पुढे कशी कामगिरी करतो, गोलंदाजी करतो का? ते लवकरच समजेल.