मुंबई: येत्या 9 जूनपासून म्हणजे उद्यापासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात प्लेइंग-11 मध्ये कोणाला स्थान मिळणार? कोण कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार? या बद्दल अनेक प्रश्न आहेत. IPL 2022 मध्ये खेळाडू ज्या रोलमध्ये होते, तो त्यांचा रोल आगामी सीरीजमध्ये बदलला जाईल. हार्दिक पंड्याचे (Hardik Pandya) उद्हारण घेता येईल. गुजरात टायटन्सच्या विजयात हार्दिक पंड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला. खेळपट्टीवर टीकून त्याने फलंदाजी केली. डावाला आकार दिला. एकहाती सामने जिंकून दिले. पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिकची भूमिका बदलेली असेल. आयपीएलमध्ये हार्दिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. पण आता हार्दिकला टॉप 5 मध्ये फलंदाजीची संधी मिळणार नाही. हेड कोच राहुल द्रविड यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.
“सामना सुरु होण्याआधी मी तुम्हाला बॅटिंग ऑर्डर बद्दल सांगणार नाही. काही वेळा भारतीया संघासाठी तुमची जी भूमिका असते, तशीच फ्रेंचायजी मॅचेसमध्येही असते. पण काही वेळा तुम्हाला वेगळ्या टीम साठी थोडी वेगळी भूमिका बजावावी लागू शकते” असं राहुल द्रविड पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
“हार्दिक उत्तम क्रिकेटपटू आहे. याआधी भारतासाठी त्याला चांगली कामगिरी करताना आपण पाहिलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये तो यशस्वी आहे. आयपीएलमध्ये सुद्धा तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यामुळे अशा दर्जाचा खेळाडू संघात असणं ही समाधानाची बाब आहे” असं द्रविड म्हणाले.
भारताच्या Playing – 11 मध्ये उद्या कोण-कोण असेल, हे आत्ताच सांगणं खूप कठीण आहे. कारण प्रत्येक खेळाडूला संधी मिळाली पाहिजे, असं वाटतं. कारण भारतीय संघातही एकापेक्षा एक सरस खेळाडू भरले आहेत. भारताकडून केएल राहुल आणि इशान किशन ही जोडी सलामीला येऊ शकते.
भारताची संभाव्य Playing 11
केएल राहुल, (कॅप्टन) इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान,