मुंबई: आशिया कप (Asia cup) मध्ये यावेळी भारतीय संघ आपला स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय (Jasprit bumrah) उतरणार आहे. कारण बुमराह दुखापतग्रस्त आहे. बुमराह खेळत नसला, तरी टीम इंडियासाठी चिंता करण्याच कारण नाहीय. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik pandya) जसप्रीत बुमराहची जागा घ्यायला तयार आहे. त्यासाठी हार्दिक पंड्याने फक्त जसप्रीत बुमराहची बॉलिंग Action च कॉपी केली नाही, तर त्याच्यासारख सेलिब्रेशन सुद्धा शिकून घेतलय. हार्दिक पंड्याच्या व्हिडिओवर फक्त जसप्रीत बुमराहनेच नाही, तर कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्याने सुद्धा कमेंट केलीय.
हार्दिक पंड्या सध्या जसप्रीत बुमराहची कॉपी करतोय. त्याने शेयर केलेल्या व्हिडिओवरुन हा खुलासा झालाय. या व्हिडिओत हार्दिक पंड्या नेट्स मध्ये अभ्यास करताना दिसतोय. त्याने बुमराहच्या Action मध्ये बॉलिंग केली. चेंडू टाकल्यानंतर हार्दिकने बुमराहसारखी Reaction सुद्धा दिली. हार्दिक आपलं हसू रोखू शकला नाही. कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डने हार्दिकची तुलना स्टार फुटबॉलर जलाटान इब्रोहिमोविचशी केली.
बुमराहने सुद्धा हार्दिकच्या या व्हिडिओवर Reaction दिलीय. ‘बॉलिंग Action (टारगेटवर एकदम अचूक) सेलिब्रेशन माहित नाही’. बुमराहच्या कमेंटचा अर्थ होता की, हार्दिकने त्याची बॉलिंग Action व्यवस्थित कॉपी केली. पण त्याची सेलिब्रेशनची स्टाइल योग्य नाही.
हार्दिक पंड्या आशिया कप साठी भारतीय संघाचा भाग आहे. पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम मध्ये नाहीय. त्याला पाठिची दुखापत झालीय. त्यामुळे त्याला आराम करण्याता सल्ला देण्यात आला आहे. तो सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलटेशन प्रोग्रॅम मध्ये आहे.