मुंबई: पाकिस्तानशी (IND vs PAK) दोन हात करण्यासाठी भारतीय संघ दुबई मध्ये घाम गाळतोय. 28 ऑगस्टला होणाऱ्या सामन्याची भारतीय संघ (Team india) जोरदार तयारी करतोय. भारतीय फलंदाज नेट्स मध्ये हिटिंगची प्रॅक्टिस करतायत. गुरुवारी आयसीसी क्रिकेट अकादमीच्या मैदानात भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव केला. या दरम्यान सर्व भारतीय फलंदाज सिक्सची प्रॅक्टिस करताना दिसले. विराट कोहली, (Virat kohli) रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत सोबत हार्दिक पंड्याने हिटिंगची प्रॅक्टिस केली. या प्रॅक्टिस सेशन दरम्यान लेग स्पिनर रवी बिश्नोई थोडक्यात बचावला.
हार्दिक पंड्या नेट्स मध्ये स्पिनर्सची गोलंदाजी खेळत होता. हरप्रीत बरार आणि रवी बिश्नोई गोलंदाजी करत होते. हरप्रीत बरार चेंडूवर पंड्याने लांब लचक षटकार खेचले. पण रवी बिश्नोईने पंड्याला चांगलच सतावलं. पंड्याने बिश्नोईच्या गोलंदाजीवर एक जोरदार फटका खेळला. जो सरळ बिश्नोईच्या तोंडाजवळ आला. बिश्नोई कसाबसा खाली वाकला व त्याने स्वत:च नाक वाचवलं. हार्दिकच्या या फटक्यानंतर बिश्नोई हसत होता. पण सगळ्यांना माहित आहे, क्षणभराचा जरी उशीर झाला असता, तर बिश्नोईला गंभीर मार लागला असता.
हार्दिक पंड्याने जो फटका खेळला, त्यावर रवी बिश्नोई थोडक्यात बचावला. पण त्यानंतर बिश्नोईने आपल्या गोलंदाजीने हार्दिक पंड्याला चांगलच सतावलं. बिश्नोईने पंड्याला दोन वेळा आऊट केलं. पहिल्यांदा बिश्नोईने पंड्याला एका जबरदस्त गुगली चेंडूवर बोल्ड केलं. पंड्या आपल्या त्या शॉट सिलेक्शनवर खूप निराश दिसला. बिश्नोई भले जबरदस्त गोलंदाजी करत असेल, पण त्याचा प्लेइंग इलेव्हन मध्ये समावेश होणं कठीण आहे. भारतीय संघ दोन स्पिनर सोबत मैदानात उतरु शकतो. यात युजवेंद्र चहल आणि अश्विनला संधी मिळू शकते.