टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे. आयपीएलमध्ये आलेले अपयशाबरोबर कौटुंबीक कारणामुळे त्याच्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी आणि आता पत्नी नताशा स्टॅनकोविच सोबत वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहे. यामुळे या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहे. परंतु या बाबत या जोडप्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी नताशाचा व्हिडिओ आला होता. त्यावेळी तिला घटस्फोटासंदर्भात विचारले तेव्हा ‘थँक्यू व्हेरी मच’ असे उत्तर देऊन काढता पाय घेतला होता. हार्दिकने 2020 मध्ये नताशा स्टॅनकोविचसोबत लग्न केले होते. त्या लग्नातील एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यात लग्नाच्या परंपरेत बूट लपवल्यानंतर हार्दिकने मेहुणीला किती रक्कम दिली ते समोर येत आहे.
हार्दिक-नताशाने 14 फेब्रुवारी 2020 ला राजस्थानच्या उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. या लग्नसोहळ्याला काही खास पाहुणे आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदू विवाह परंपरेचा हा व्हिडिओ आहे. या परंपरेनुसार मेहुणेने बुट लपवल्यानंतर त्या बदल्यात तिला शगून म्हणून विशिष्ट रक्कम दिली जाते. त्यावेळी हार्दिकची मेहुणी पंखुरी हिने बुट लपवला.
पंखुरीने जिजा हार्दिककडे पैशांची मागणी केली. हार्दिकने विचारले किती पाहिजे. तिने एक लाख सांगितले. परंतु हार्दिकने मेहुणी पंखुरीला पाच लाख एक रूपये देत असल्याचे सांगत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. या जोडप्याला अगस्त्य हा तीन वर्षांचा मुलगाही आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, हार्दिकने व्याजासह ५ लाख रुपये घ्यावेत. दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हार्दिक भाईबद्दल वाईट वाटत आहे.” दरम्यान, आणखी एका युजरने ‘लोक कधी बदलतात हे कळत नाही’, अशी टिप्पणी केली.