हार्दिक पांड्याची खरी अग्निपरीक्षा, या दोन बलाढ्य संघाशी होणार सामना

| Updated on: Apr 10, 2024 | 4:31 PM

मुंबई इंडियन्सची सुरुवात खुपच खराब झाली आहे. असं असलं तरी तीन सामन्यानंतर मुंबईला विजयाची चव चाखता आली आहे. पण आता पुढचे दोन सामने मुंबईसाठी आव्हानात्मक आहेत. कारण त्यांना आरसीबी आणि सीएसकेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याची खरी कसोटी लागणार आहे.

हार्दिक पांड्याची खरी अग्निपरीक्षा, या दोन बलाढ्य संघाशी होणार सामना
Follow us on

Mumbai Indians IPL: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला सलग तीन वेळा पराभवाचा सामना  करावा लागला आहे. चौथ्या सामन्यात त्यांनी आपला पहिला विजय नोंदवला आहे. संघाने खाते उघडले असले तरी ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. त्यामुळे अजून तरी प्ले ऑफसाठी सर्व संघाना संधी आहे. पण मुंबईला पुढचे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे खरी कसोटी ही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची असेल. कारण त्याला आता दोन मोठ्या संघांचा सामना करावा लागणार आहे.

पहिल्या तीन सामन्यात पराभव

यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून 6 धावांनी पराभव झाला होता. यानंतर सनरायझर्स हैदराबादकडून मुंबईचा 31 धावांनी पराभव झाला. इतकंच नाही तर घरच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने मुंबई संघाचा 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे हार्दिक पांड्याला चाहते ट्रोल करु लागले होते. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे पहिला विजय मिळवला आहे.

सलग तीन पराभवा झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यावर हल्लाबोल झाला होता. मात्र चौथ्या सामन्यात त्याला पहिल्या विजय मिळाल्याने जरा दिलासा मिळालाय. घरच्या मैदानावर मुंबईने दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला. आता विश्रांतीनंतर मुंबईचा संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आता त्यांचा सामना आरसीबी आणि सीएसकेशी होणार आहे. जो आयपीएलचा सर्वात मोठा सामना मानला जातोय.

RCB आणि CSK ला भिडणार

11 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी मुंबई संघ आरसीबीशी भिडणार आहे तर 14 एप्रिलला मुंबईचा सामना सीएसकेशी होणार आहे. आरसीबी आणि सीएसकेनेही आपले काही सामने गमावले आहेत, त्यामुळे ते ही विजयासाठी चांगली कामगिरीवर भर देतील. अशा स्थितीत हे दोन्ही सामने जिंकण्यासाठी मुंबईला मोठी कसरत करावी लागणार आहे.

मुंबईचे हे दोन्ही सामने घरच्या म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी प्लस पॉईंट असेल. मुंबईला आता आरसीबी आणि सीएसके विरुद्ध चांगली कामगिरी करुन सामने जिंकावे लागतील. यामध्ये खरी परीक्षा ही कर्णधार हार्दिक पांड्याची असणार आहे.