मैदानावर करिष्मासाठी ओळखला जाणारा हार्दिक पांड्या नेहमीच चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घटस्फोटाच्या बातम्या व्हायरल होत होत्या. यावर मात्र आहे शिक्कामोर्तब झाला आहे. हार्दिकची पत्नी नतासा स्टॅनकोविक आणि हार्दिकने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. नतासासोबतच्या घटस्फोटाची पोस्ट शेअर करण्याआधीच तो कोणाला तरी डेट करत असल्याची बातमी देखील आली होती. हार्दिक पंड्याचा एका मुलीसोबतच्या व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर देखील याबाबत चर्चा सुरु होती. हार्दिक हा प्राची सोलंकी नावाच्या मुलीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दोघे एकत्र फोटोसाठी पोज देताना दिसले होते. हार्दिक आणि प्राची एकमेकांना डेट करत असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राचीचे हार्दिकच्या कुटुंबासह त्याचा भाऊ कृणाल पांड्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले, “नतासापेक्षा चांगली.” दुसरा म्हणाला, “तिच्याशी लग्न कर.” तिसऱ्याने टिप्पणी दिली, “नतासा स्टॅनकोविकची जागा घेण्यात आली आहे.” एकाने म्हटले की, “भाभी 2”.
हार्दिक आणि नताशा यांच्यात नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. या बातम्या अनेक दिवसांपासून व्हायरल होत होत्या. जानेवारी 2020 मध्ये दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर जुलैमध्ये त्यांनी मुलाचे अगस्त्यचे स्वागत केले होते. पण काही महिन्यांत त्यांचा घटस्फोट झाला.
हार्दिक आणि नताशा यांनी अनेक दिवस याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अखेर त्यांनी आज याची घोषणा केलीये. नताशा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. पण तिने देखील अनेक दिवस यावर काहीही भाष्य केलेले नाही.