Harmanpreet Kaur ने देशापासून काय लपवलं? पराभवानंतर देशासमोर ती गोष्ट नाही येऊ दिली

| Updated on: Feb 24, 2023 | 8:20 AM

INDW vs AUSW T20 WC Semifinal : कॅप्टन हरमनप्रीत कौरने भारताकडून सर्वाधिक 52 धावा केल्या. पण तरीही ती टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांच मन मोडलं.

Harmanpreet Kaur ने देशापासून काय लपवलं? पराभवानंतर देशासमोर ती गोष्ट नाही येऊ दिली
harmanpreet kaur
Image Credit source: Screengrab
Follow us on

INDW vs AUSW T20 WC Semifinal : भारतीय महिला टीमच T20 वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने 5 धावांनी हरमनप्रीत कौरच्या टीमचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 173 धावांच लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय टीमने 167 धावाच केल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने भारताकडून सर्वाधिक 52 धावा केल्या. पण तरीही ती टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांच मन मोडलं. पराभवानंतर हरमनप्रीत कौर काळा चश्मा घालून प्रेजेंटेशनसाठी पोहोचली.

काळा चश्मा घालण्यामागच कारणही हरमनप्रीत कौरने यावेळी सांगितलं. “माझ्या देशाने मला रडताना पहाव, अशी माझी अजिबात इच्छा नाहीय. म्हणूनच मी चश्मा लावून आली आहे. यावेळी मला मी कमनशिबी ठरल्याची जाणीव होते. जेमिमा रॉड्रिग्ससोबत बॅटिंग करताना आम्ही सामन्यात पुनरागमन केलं होतं” असं हरमनप्रीत कौर यावेळी म्हणाली.

शेवटपर्यंत लढायच होतं

“तुम्हाला सूर सापडल्यानंतर तिथून तुमचा पराभव होईल, अशी अपेक्षा करु शकत नाही. ज्या पद्धतीने मी रनआऊट झाली, त्यापेक्षा जास्त काही दुर्देवी असू शकत नाही. प्रयत्न करणं महत्त्वाच असतं. आम्ही शेवटपर्यंत खेळलो याचा आनंद आहे. आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढायच होतं” असं हरमनप्रीत म्हणाली.

फिल्डिंगमध्ये चूका

“आम्हाला धावांचा पाठलाग करायचा होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करणं आमच्यासाठी चांगली बाब होती. सुरुवातीला आम्ही लवकर दोन विकेट गमावल्या. त्यावेळी आमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत, हे आम्हाला माहित होतं. मला जेमिमाला क्रेडीट द्यायच आहे. तिच्यामुळे आम्ही पुनरागमन करु शकलो. चांगली कामगिरी पाहून बरं वाटलं. एकूणच आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो. फिल्डिंगमध्ये काही चूका केल्या. काही सोपे झेल सोडले. आम्ही यातून शिकू शकतो” असं हरमनप्रीत म्हणाली.