MI vs UPW : Harmanpreet Karur कडून धोनीची बरोबरी, स्टार्कची बायको हतबल, 45 मिनिटात गेम ओव्हर

| Updated on: Mar 13, 2023 | 10:05 AM

MI vs UPW : कॅप्टनशिपमध्ये तिने धोनीची बरोबरी केलीय. WPL मध्ये तिने तेच केलं, जे आयपीएलमध्ये धोनीने केलं. रविवारी यूपी वॉरियर्स विरुद्ध हरमनप्रीत कौरने आक्रमक बॅटिंग केली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ही मॅच झाली.

MI vs UPW : Harmanpreet Karur कडून धोनीची बरोबरी, स्टार्कची बायको हतबल, 45 मिनिटात गेम ओव्हर
Harmanpreet kaur
Image Credit source: jio cinema
Follow us on

MI vs UPW : सध्या सुरु असलेल्या WPL मध्ये हरमनप्रीत कौर जबरदस्त बॅटिंग करतेय. ती शानदार फॉर्ममध्ये आहे. स्वत: आघाडीवर राहून ती मुंबई इंडियन्सच नेतृत्व करतेय. WPL मध्ये तिने 3 पैकी 2 सामन्यात अर्धशतक झळकवलय. कॅप्टनशिपमध्ये तिने धोनीची बरोबरी केलीय. WPL मध्ये तिने तेच केलं, जे आयपीएलमध्ये धोनीने केलं. रविवारी यूपी वॉरियर्स विरुद्ध हरमनप्रीत कौरने आक्रमक बॅटिंग केली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ही मॅच झाली. यूपी वॉरियर्सने पहिली बॅटिंग केली.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची बायको एलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली यूपीने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 159 धावा केल्या. एलिसा हिलीनेच यूपीकडून सर्वाधिक 58 रन्स केल्या. तिच्याशिवाय ताहिला मॅक्ग्राने 50 धावा केल्या.

45 मिनिटं 33 चेंडू हरमनप्रीतने संपवला खेळ

मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 160 धावांच टार्गेट होतं. यूपीची गोलंदाजी लाइन अप पाहता लक्ष्य सोपं नव्हतं. मुंबईच्या ओपनिंग जोडीने 58 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हरमनप्रीत कौर क्रीजवर उतरली, तिने वेगाने धावा बनवल्या.

160 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फटकेबाजी

हरमनप्रीत कौरने इंग्लंडची फलंदाज नॅट सिवरच्या साथीने मिळून मॅच संपवली. दोघींनी फास्ट बॅटिंग केली. 160 धावांच लक्ष्य 17.4 ओव्हरमध्ये पार केलं. हरमनप्रीतने 45 मिनिटात यूपीच्या 6 गोलंदाजांचा सामना केला. तिने 33 चेंडूत नाबाद 53 धावा फटकावल्या. 160 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने तिने फटकेबाजी केली. हरमनप्रीत कौरने 9 चौकार आणि 1 षटकार लगावला.
धोनीसारखच काम हरमनप्रीतने केलं

हरमनप्रीत कौरच WPL 2023 मध्ये हे दुससं अर्धशतक आहे. नॅट सिवर 31 चेंडूत 45 धावांवर नाबाद राहिली. दोघींमध्ये भागीदारी झाली. मुंबईने ही मॅच 8 विकेटने जिंकली. लीगमधील मुंबई टीमचा हा चौथा विजय आहे. हरमनप्रीतने धोनीची बरोबरी केली आहे. धोनीने आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून 4 सामने जिंकले होते, आता तेच काम WPL मध्ये हरमनप्रीतने केलय.