मुंबई: IPL 2022 च्या बरोबरीने महिला T 20 चॅलेंज स्पर्धाही सुरु आहे. आज वलोसिटी आणि सुपरनोवाज (velocity vs supernovas) या दोन टीममध्ये दुसरा सामना झाला. या सामन्यात वेलोसिटीने सुपरनोवाजला सात विकेटने हरवलं. पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हे सामने सुरु आहेत. सुपरनोवाजने प्रथम फलंदाजी करताना 151 धावांच टार्गेट दिलं होतं. वेलोसिटीने 10 चेंडू राखून हे लक्ष्य आरामात पार केलं. वेलोसिटीच्या विजयात शेफाली वर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने शानदार 51 धावांची खेळी केली. टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करणाऱ्या सुपरनोवाजने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावून 150 धावा केल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने शानदार फलंदाजी केली. तिने 51 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. त्याशिवाय तानिया भाटियाने 36 धावांचे योगदान दिले.
WHAT. A. CATCH! ? ?
Absolute screamer from @ImHarmanpreet! ? ?
Velocity lose their third wicket as Shafali Verma departs for 51.
Follow the match ? https://t.co/ey7pHvLcGi #My11CircleWT20C #SNOvVEL pic.twitter.com/ryq6Se3r9K
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
दरम्यान आज या सामन्यात सुपरनोवाजची कॅप्टन हरमनप्रीत कौरने जबरदस्त झेल घेतला. या झेलला कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं जातय. फिल्डिंगमध्ये महिला क्रिकेटपटूही कुठे मागे नाहीत. त्याही पुरुषांच्या तोडीच क्षेत्ररक्षण करतात, हेच हरमनप्रीत कौरच्या झेलमधून दिसून आलं.
तुम्ही सुद्धा ही कॅच पाहून हरमनप्रीत कौरचे फॅन व्हाल इथे क्लिक करा
तुफान बॅटिंग करणाऱ्या शेफाली वर्माने शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने फटका खेळला. त्यावेळी हरमनप्रीतने डाइव्हमारुन एकाहाताने जबरदस्त झेल घेतला. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ही कॅच पाहिल्यानंतर प्रत्येक जण हरमनप्रीत कौरचा फॅन झालाय. वेलोसिटीच्या इनिंगमध्ये 10 व्या षटकात डायंड्रा डॉटिन बॉलिंग करत होती. चौथ्या चेंडूवर शेफालीने कट शॉटचा फटका खेळला. हरमनप्रीतने डाइव्ह मारुन कॅच घेतली.