मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (Indian Premier League 2022)आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्याने IPL स्पर्धेला प्रारंभ होत आहे. आयपीएलच्या सर्व सामन्यांचे डिजनी + हॉटस्टार (Disney+ Hotstar) आणि JioTV अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. तुम्ही क्रिकेटचे चाहते आहात आणि तुमच्याकडे टीव्ही केबल कनेक्शन नसेल, तर तुम्ही Disney+ Hotstar रिचार्ज प्लानचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. Disney+ Hotstar वर भारतामध्ये तीन सबस्क्रिप्शन प्लान आहेत. यात सुपर पॅक, प्रीमियक वार्षिक पॅक आणि प्रीमियम मंथली प्लानचा समावेश आहे. Disney+ Hotstar 299 रुपयांच्या प्लानमध्ये सर्व चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही, चार डिवाइससाटी स्पेशल एक्सेसची सुविधा आहे. 2160 पिक्सल व्हिडिओ क्वालिटी आणि डॉल्बी 5.1 सपोर्ट मिळतो. या प्लानसोबत स्ट्रीम केलेले चित्रपट, शो, खेळ आणि दुसऱ्या कंटेंटचा ADD free अनुभव घेता येतो.
899 रुपयांचा प्लान
Disney+ Hotstar वर 899 रुपयांचाही एक प्लान आहे. या प्लानमध्ये वर्षभरासाठी सर्व चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही, दोन डिवाइससाठी स्पेशल एक्सेस मिळतो. या प्लानमध्ये फुल एचडी किंवा 1080 पिक्सल व्हिडिओ क्वालिटी आणि डॉल्बी 5.1 सपोर्ट मिळतो. सबस्क्रायबर्सना या प्लानमध्ये ADD फ्री अनुभव मिळत नाही.
1499 रुपयांचा प्लान
Disney+ Hotstar वर 1499 रुपयांच्या प्लानमध्ये वर्षभरासाठी सर्व चित्रपट, लाइव स्पोर्ट्स, टीव्ही, चार डिवायसेसवर स्पेशल एक्सेसची सुविधा आहे. 2160 पिक्सल व्हिडिओ क्वालिटी आणि डॉल्बी 5.1 सपोर्ट मिळतो. या प्लानसोबत स्ट्रीम केलेले चित्रपट, शो, खेळ किंवा दुसरा कंटेट ADD फ्री अनुभवता येतो.
Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन कसं घेऊ शकता?
Disney+ Hotstar च्या तीन प्लान्सपैकी एकाच सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही थेट (https://www.hotstar.com/in/subscribe/get-started) वेबसाइटवर जाऊ शकता.
Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन साठी तुम्हाला पेमेंट करायचे नसेल, तर तुम्ही Jio, Vi किंवा Airtel प्लान्सचा ऑप्शन निवडू शकता. तुम्ही Jioआणि Airtel प्लान्सची लिस्ट पाहू शकता. इथे तुम्हाला एक वर्षासाठी मोफत Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन मिळू शकतं.