SRH कडून डेव्हिड वॉर्नरला वाईट वागणूक, टीमसोबत बसमधून प्रवास करण्यापासून रोखले

| Updated on: Oct 01, 2021 | 6:12 PM

सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे (Sunrisers Hyderabad) मार्ग आता वेगळे झाले आहेत.

SRH कडून डेव्हिड वॉर्नरला वाईट वागणूक, टीमसोबत बसमधून प्रवास करण्यापासून रोखले
डेव्हिड वॉर्नर
Follow us on

मुंबई : सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे (Sunrisers Hyderabad) मार्ग आता वेगळे झाले आहेत. त्यांच्यातील मतभेदाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. या हंगामात वॉर्नर यापुढे सनरायझर्सकडून कोणताही सामना खेळणार नसल्याचे वृत्त आहे. InsideSport.co च्या मते, हा निर्णय खेळाडू आणि फ्रँचायझी दोघांनी परस्पर मान्य केला आहे. (Hyderabad’s worst behavior with David Warner, prevented from traveling in team bus, forced to stay in hotel!)

वॉर्नर आणि हैदराबाद संघ या दोघांमधील दीर्घ सहवास आता संपला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मालिकेची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा आयपीएल 2021 मध्ये डेव्हिड वॉर्नर हिरोपासून झिरो बनत गेला. वॉर्नरने कर्णधार म्हणून हंगामाची सुरुवात केली. पण आधी त्याचे कर्णधारपद काढून टाकण्यात आले आणि आता हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले, त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने मैदानावर येण्याऐवजी हॉटेलच्या खोलीत राहणे पसंत केले. संघ व्यवस्थापन आणि वॉर्नरमधील वाद इथवरच थांबलेला नाही, तर हे प्रकरण आता आणखी पुढे गेलं आहे. कारण संघ व्यवस्थापनाकडून वॉर्नरला वाईट वागणूक मिळत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाकडून डेव्हिड वॉर्नरला वाईट वागणूक मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला संघाच्या अखेरच्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये येऊ दिले जात नाही. यामुळे, सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांदरम्यान तो डगआऊटमध्येही दिसत नाही. तो टीमच्या हॉटेलमध्येच थांबतोय.

स्पोर्ट्स टुडेनुसार, 30 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नर हॉटेलमध्ये होता. शारजामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यासाठी त्याला संघासोबत प्रवास करण्याची परवानगी नव्हती. स्पोर्ट्स टुडे या यूट्यूब चॅनेलवर सांगण्यात आले आहे की, वॉर्नर अनुपस्थित असताना हैदराबाद संघाच्या शीटवर मोहम्मद नबी आणि मनीष पांडे सारख्या वरिष्ठ खेळाडूंची नावे होती. यापूर्वी, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही वॉर्नर स्टेडियममध्ये नव्हता. तो हॉटेलमधूनच मॅच पाहात होता. हैदराबादच्या विजयानंतर त्याने इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये टीव्हीचे फोटो शेअर करुन आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

पुढच्या वर्षी वॉर्नर नव्या संघात दिसणार?

सूत्रांनी पुढे सांगितले, “पुढील हंगामासाठी नवीन लिलाव होणार आहे. सर्व संघ पुन्हा नव्याने सुरू होतील. गेल्या 2 हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खराब राहिली आहे. त्यामुळे ऑरेंज आर्मीलाही एक उत्तम संघ बनवण्याची संधी मिळणार आहे. वॉर्नर आणि SRH ने याआधी चांगलं प्रदर्शन केलं आहे. परंतु आमच्यासाठी नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे.”

IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात संघ आणि वॉर्नरमध्ये मतभेद

आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातही वॉर्नर आणि संघ व्यवस्थापनामध्ये वाद झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि कर्णधारपद केन विल्यमसनकडे सोपवण्यात आले. आता आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात सलग दोन सामन्यांमध्ये वॉर्नरच्या अपयशानंतर जेसन रॉयला संघात स्थान देण्यात आले. वॉर्नर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात 2 धावांवर बाद झाला. त्यानंत कालच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नाही.

इतर बातम्या

ऑक्टोबरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, आधी IPL मग T-20 वर्ल्डकपचा थरार, ‘या’ तारखा लॉक करुन ठेवा

धोनीचा स्टेडियमबाहेर उत्तुंग षटकार पाहून साक्षी-झिवाचा जल्लोष, पाहा धोनीची खास ‘Family Moment’

SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर

(Hyderabad’s worst behavior with David Warner, prevented from traveling in team bus, forced to stay in hotel!)