जोहान्सबर्ग: भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी पुन्हा एकदा ऋषभ पंतला झापलं आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावर काल कॉमेंट्री करताना गावस्कर भडकले होते. नॅचरल खेळ वैगेर बकवास बंद करा असे गावस्कर म्हणाले होते. “सर्व लक्ष पुजारा आणि रहाणेवर का? ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर पंतनेही विशेष कामिगरी केलेली नाही” या प्रश्नाकडे एका चाहत्याने लक्ष वेधले. (‘I am certain Dravid must have given him a ‘bamboo” Gavaskar slams Pant again)
फलंदाजीला तुम्ही येता, तेव्हा सुरुवीताचा वेळा सोपा नसतो
त्यावरुन गावस्करांनी पुन्हा एकदा पंतला झापलं. “हा योग्य प्रश्न आहे. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियात अशा पद्धतीचा खेळ केला नाही. तिथे त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवलं. फलंदाजीला तुम्ही येता, तेव्हा सुरुवीताचा वेळा सोपा नसतो. सेट झाल्यानंतर खेळपट्टीचा अंदाज घेतला. त्यानंतर त्याने मोठे फटके खेळले. ऑस्ट्रेलियात त्याने हेच केले होते” असे गावस्कर एका कार्यक्रमात म्हणाले.
जेम्स अँडरसनसमोर असताना मोठे फटके खेळले होते
“इंग्लंडचा संघ भारतात आला होता, तेव्हा त्याने जेम्स अँडरसनसमोर असताना मोठे फटके खेळले होते. त्यावेळी त्याने चांगल्या पद्धतीने खेळ केला होता. पण त्यानंतर खेळण्याची हीच पद्धत आहे, असे त्याला वाटत असावे. खेळण्याची ही पद्धत नाही. मला खात्री आहे, चेंजिंग रुममध्ये द्रविड यावरुन त्याला काही तरी बोलणार. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं, तर मला खात्री आहे द्रविडने त्याला बांबू लावला असणार” असे गावस्कर म्हणाले.
काल गावस्कर काय म्हणाले?
“क्रीजवर दोन नवीन फलंदाज आहेत आणि ऋषभ पंत असा फटका खेळतो. या फटक्यासाठी तुम्हाला कुठलही कारण देता येणार नाही. तो त्याचा नैसर्गिक खेळ आहे, वैगेरे बकवास बंद करा. थोडी तरी जबाबदारी दाखवायला पाहिजे होती” अशा शब्दात गावस्करांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला संताप व्यक्त केला.
संबंधित बातम्या:
IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये पावसामुळे कुठल्या संघाला होईल फायदा?
ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी भारताची कॅप्टन मिताली राजबद्दल काही खास गोष्टी
IND vs SA: ‘तुम्ही जोहान्सबर्ग कसोटी जिंका हेच त्याच्यासाठी बेस्ट बर्थ डे गिफ्ट’, गावस्करांची टीम इंडियाला विनंती
(‘I am certain Dravid must have given him a ‘bamboo” Gavaskar slams Pant again)