कोलकाता: यंदाच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय चाहत्यांनी टीम इंडिया जिंकणारच या विश्वासाने सेलिब्रेशनचे बेत आखले आहेत. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी या सामन्यात टीम इंडियाचा पराभवही होऊ शकतो, अशी शक्यता बोलून दाखवली आहे.
भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. आपली फलंदाजी मजबूत आहे, जसप्रीत बुमराहच्या समावेशामुळे गोलंदाजीलाही धार आली आहे. मात्र, मला आतून असं वाटतंय की, यावेळी पाकिस्तानचा संघ अधिक तगडा आहे, त्यांचं पारडं जड वाटतंय. पण भारतीय संघ जिंकेल, अशी आशाही मला वाटत असल्याचे मनोज तिवारी यांनी सांगितले. आता त्यांचा हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहावे लागेल.
India’s record against Pakistan is good. Our batting is good & with Bumrah bowling performance also improved. I’ve a feeling that this time Pakistan side is looking a bit strong but hoping that India will win: Manoj Tiwary, former cricketer & West Bengal minister#INDvPAK pic.twitter.com/5MpsUa7hFE
— ANI (@ANI) October 24, 2021
आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांनी कितीवेळा पराभूत केलं याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतोय. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल, असं विराट कोहली म्हणाला.
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
पाकिस्तानी संघ: बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हारिस रउफ
संबंधित बातम्या:
(T20 World Cup 2021 India vs Pakistan)