मुंबई: एबी डीविलियर्सशिवाय (AB de Villiers) इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) हा पहिला सीजन आहे. एबी डिविलियर्स हा असा एकमेव खेळाडू आहे, जो 2008 पासून 2021 पर्यंत प्रत्येक सीजनमध्ये आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. आयपीएलमध्ये 14 पैकी 11 वर्ष तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळला. या काळात मैदानाबाहेरही भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat kohli) बरोबर त्याची चांगली गट्टी जमली. आयपीएल 2021 चा सीजन संपल्यानंतर एबीडी विलियर्सने आयपीएलमधून त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. डिविलियर्सच्या निवृत्तीबद्दल समजलं, तो क्षण कसा होता, त्याची आठवण विराटने सांगितली. RCB ने त्यांच्या टि्वटर हँडलवर विराट कोहलीचा एक व्हिडिओ रिलीज केलाय. त्यामध्ये विराट डि विलियर्सकडून आलेल्या व्हॉईस नोट बद्दल बोलला.
“डिविलियर्सने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली, तो खूप वेगळा क्षण होता. मला तो दिवस चांगला लक्षात आहे. त्याने मला व्हॉइस नोट पाठवली होती. माझ्या चांगलं लक्षात आहे, वर्ल्ड कप संपल्यानंतर आम्ही दुबईवरुन परत येत होतो. आम्ही घराच्या दिशेने चाललो होतो, त्यावेळी व्हॉइस नोट मिळाली. मी ती व्हॉइस नोट ओपन करुन ऐकली. अनुष्का माझ्या शेजारी बसली होती. मी तिच्याकडे बघितलं, त्यावेळी तिने मला सांगू नको, ही तिची पहिली Reaction होती. तिला माहित होतं” असं विराट म्हणाला.
It’s not just you fans, even @imVkohli misses @ABDeVilliers17 at RCB, and he opens up about their bond, the memories they’ve shared, and much more, on @KreditBee presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/WXNfsqe3L6
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 29, 2022
एबी डीविलियर्स निवृत्तीचे संकेत देतोय, याची मला थोडीफार कल्पना आली होती. त्याबद्दलही विराटने सांगितलं. “मला मागच्या आयपीएलपासनूच याचा अंदाज होता. तो मला सांगता होता, एकदिवस आपण एकत्र कॉफी प्यायला जाऊ. मी नर्वस होतो. काहीतरी घडणार असं मला वाटत होतं” असं विराटने सांगितलं. “डिविलियर्सच्या निवृत्तीबद्दल कळलं, तो खूप वेगळा क्षण होता. मी खूप भावूक झालो होतो. तो वॉईस मेसेजही खूप इमोशनल होता. मला आता अजून खेळायचं नाही. मी त्याच्यासोबत अनेक क्षण घालवलेत. अनेक चढ-उतार बघितलेत. तो नेहमीच माझ्यासोबत होता” असं विराट म्हणाला.