T20 World Cup 2021: यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cup 2021) कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून परभाव पत्कारावा लागला आहे. सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात केली. दरम्यान 19 व्या षटकात पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल सोडला आणि हाच झेल ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे कारण बनला. मात्र पाकिस्तानने जरी हा झेल पकडला असता तरीदेखील आम्हीच जिंकलो असतो अशी प्रतिक्रिया मॅचनंतर ज्याचा झेल सुटला तो ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडने दिली आहे.
19 व्या षटकात मॅथ्यूच्या तुफान सिक्सेसमुळे पाकला सामना पाकला गमवावा लागला. पण याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल देखील सोडला. जो सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला. कारण ती कॅच घेतली असती तर पुढील षटकार मॅथ्यू मारु शकला नसता आणि पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला नसता. मात्र माझा झेल जरी घेतला असता तरी आम्ही तेव्हा मजबूत स्थितीमध्ये होतो. जिंकण्याचा पूर्ण आत्मविश्वास होता. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडला नसता आम्हीच जिंकलो असतो अशी प्रतिक्रिया मॅथ्यूने दिली आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या गुरुवारी झालेला हा सेमी फायनलचा सामना तसा कमालीचा चुरशीचा झाला. एखाद्या रोलर कोस्टर राइडप्रमाणे कधी पाकच्या तर कधी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झुकणाऱ्या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियानेच सरशी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 176 धावांपर्यंत मजल मारली होती. जे टार्गेट ऑस्ट्रेलियाने 5 गडी आणि एक ओव्हर राखून पूर्ण केले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड हे विजयाचे शिल्पकार ठरले.
संबंधित बातम्या