दुबई : स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध आयपीएल 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा खलनायक ठरला. अश्विनच्या मोठ्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीची संधी गमावली. दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात 7 धावा वाचवायच्या होत्या, पण आर अश्विन असे करण्यात अपयशी ठरला. कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) शेवटच्या दोन चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती आणि रविचंद्रन अश्विनकडे चेंडू होता. (I Would never pick R Ashwin in my T20 team: Sanjay Manjrekar makes bold claim)
या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर अश्विन हॅटट्रिकवर होता, पण राहुल त्रिपाठीने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून दिल्लीचे स्वप्न भंग केले. भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे की, तो रविचंद्रन अश्विन सारख्या खेळाडूला आपल्या टी – 20 संघात कधीही ठेवणार नाही आणि त्याच्या जागी वरुण चक्रवर्ती किंवा सुनील नारायणच्या रूपात विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंना संधी देईल. आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्ससाठी गोलंदाजी करणाऱ्या आर. अश्विनने सामना हातचा गमावला.
संजय मांजरेकर म्हणाले, ‘आपण अश्विनबद्दल बरंच बोललो. अश्विन टी -20 सामन्यांमध्ये कोणत्याही संघासाठी तितका प्रभावी राहिलेला नाही. जर तुम्ही अश्विनला बदलू इच्छित असाल तर असे काही होईल असे मला वाटत नाही, कारण तो गेल्या 5-7 वर्षांपासून असाच आहे. मला माहिती आहे की कसोटी सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म कौतुकास्पद आहे. मात्र त्याला इंग्लंडमध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही हे पाहून वाईट वाटले. संजय मांजरेकर म्हणाले, ‘रविचंद्रन अश्विन टी -20 क्रिकेटमध्ये तितक्या प्रभावीपणे विकेट घेत नाही आणि कोणतीही फ्रँचायझी त्याला फक्त धावा रोखण्यासाठी संघात ठेवू इच्छित नसणार.
केकेआर आणि दिल्लीमधील काल झालेला सामना म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील काही चुरशीच्या सामन्यांपैक एक ठरला. दिल्लीच्या 136 या सोप्या लक्षाचा पाठलाग केकेआरने उत्तम सुरु केला. एका क्षणी केकआरला 24 चेंडूत केवळ 13 धावांची गरज होती. सोबत त्यांच्या हातात 8 विकेट्सही होत्या. पण त्याच क्षणी दिल्लीच्या गोलंदाजानी जादूई गोलंदाजी करत केकेआरचे एक-एक फलंदाज तंबूत धाडले. एकाक्षणी 2 चेंडूत 6 धावांची गरज केकेआरला असतानाच राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी निवडली. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केली. पण संघातील सर्वच खेळाडू केकेआरच्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर गारद झाले. ज्यामुळे ते केवळ 135 धावाच करु शकले आहेत. यामध्येही शिखरने सर्वाधिक 38 तर अय्यरने नाबाद 30 धावा केल्या. य़ाशिवाय शॉ आणि स्टॉयनीसने प्रत्येकी 18 तर हीटमायरने 17 धावा केल्या. केकेआरकडून मिस्ट्री स्पीनर चक्रवर्तीने 2 तर मावी आणि फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
अवघ्या 136 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या केकेआरच्या सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाचा विजय जणू पक्का केला होता. व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी मिळून मोठी भागिदारी केली. 96 धावांवर संघ असताना अय्यर 55 धावा करुन बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर शुभमन 46 धावा करुन बाद झाला. त्याने 46 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्यासोबत नितीशने 13 धावा केल्या. पण या दोघांच्या बाद होताच संघाला जणू उतरती कळाच लागली. एक एक करत फलंदाज बाद होत गेले. अगदी शेवटच्या षटकात लागोपाठ दोन विकेट जाताच 2 चेंडूत 6 धावांची गरज संघाला होती. त्याचवेळी राहुल त्रिपाठीने दमदार असा षटकार ठोकत संघाला 3 विकेट्स आणि 1 चेंडू राखून विजय मिळवून दिला.
इतर बातम्या
KKR फायनलमध्ये पण दिनेश कार्तिकला शिक्षा, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी, IPL ने फटकारले
1 झेल 3 खेळाडू तरीही अपयश, LIVE सामन्यातील हा VIDEO पाहाच!
(I Would never pick R Ashwin in my T20 team: Sanjay Manjrekar makes bold claim)