आयसीसीकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बेस्ट टीम जाहीर, सामनावीर ठरलेल्या भारतीय खेळाडूचा पत्ता कट

| Updated on: Jul 01, 2024 | 3:39 PM

टी20 वर्ल्डकप जेतेपदावर भारतीय संघाने नाव कोरलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचं हे दुसरं जेतेपद आहे. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. आता आयसीसीने या स्पर्धेतील बेस्ट टीम जाहीर केली आहे. यात सहा भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मात्र भारताच्या दिग्गज खेळाडूला यात स्थान मिळालेलं नाही.

आयसीसीकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बेस्ट टीम जाहीर, सामनावीर ठरलेल्या भारतीय खेळाडूचा पत्ता कट
Image Credit source: BCCI
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडली असून टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यावर पावसाचं सावट होतं मात्र स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. भारताने 17 वर्षांचा प्रदीर्घ कालावधीनंतर टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं. असं असताना आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बेस्ट टीम जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या संघात सहा भारतीयांचा समावेश आहे. अफगाणिस्तानच्या तीन, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी एक खेळाडूचा समावेश आहे. तर दक्षिण अफ्रिकेच्या एनरिक नोर्त्जेला 12वा खेळाडू म्हणून स्थान दिलं आहे. आयसीसी संघातील सहा भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. मात्र अंतिम सामन्यात महत्त्वपू्र्ण खेळी केलेल्या विराट कोहलीला या संघात स्थान मिळालेलं नाही. विराट कोहलीने अंतिम सान्यात 59 चेंडूंचा सामना करून 76 धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र असं असूनही स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहता आयसीसीने त्याला संघात स्थान दिलेलं नाही.

रोहित शर्माने 8 सामन्यात 156.7 च्या स्ट्राईक रेटने 257 धावा केल्या. रहमनुल्लाह गुरबाजनंतर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे. जसप्रीत बुमराहला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने 15 महत्त्वाचे गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेड 4.17 इतका होता. वर्ल्डकप इतिहासातील हा सर्वात बेस्ट स्पेल ठरला आहे. दुसरीकडे, अर्शदीप सिंग आणि अफगाणिस्तानच्या फझलहक फारुकीने प्रत्येकी 17 गडी बाद केले असून त्यांनाही सघात स्थान मिळालं आहे. राशिद खानने 6.17 च्या इकोनॉमीने 14 गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोयनिस आणि वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला प्लेइंग 11मध्ये संधी मिळाली आहे. तर उपविजेत्या दक्षिण अफ्रिका संघातील एकही खेळाडू प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवू शकलं नाही. पण एनरिक नॉर्त्जे याची 12 वा खेळाडू वर्णी लागली आहे. खेळाडूंची स्पर्धेतील एकंदरीत कामगिरीवर ही निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंनी आपल्या खेळाचा प्रभाव या स्पर्धेत पाडला आहे.

आयसीसी जाहीर केली टी20 वर्ल्डकप बेस्ट टीम : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, रहमनुल्लाह गुरबाज, राशिद खान, फझलहक फारुकी, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन. 12वा खेळाडू: एनरिक नोर्त्जे