Rohit pawar | ‘माझे मित्र….’ म्हणत रोहित पवार यांनी जय शाह यांचे का आभार मानले ?

| Updated on: Jun 28, 2023 | 12:07 PM

Rohit pawar : पक्षीय विरोध बाजूला ठेऊन चांगल्या कामाच कौतुक करण्याचा गुण त्यांच्यामध्ये आहे. शरद पवारांमध्येही हाच गुण आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत.

Rohit pawar | माझे मित्र.... म्हणत रोहित पवार यांनी जय शाह यांचे का आभार मानले ?
rohit pawar- jay shah
Image Credit source: twitter
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जय शाह यांचे आभार मानले आहेत. रोहित पवार यांनी जय शाह यांचे आभार मानल्याने सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अमित शाह यांच्या भाजपामध्ये वैचारिक मतभिन्नता आहे. जय शाह हे अमित शाह यांचे सुपूत्र आहेत. सध्या जय शाह बीसीसीआयचे सचिव आहेत.

रोहित पवार यांनी जय शाह यांचे आभार मानल्याने आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. काहीजण या आभार प्रदर्शनाचा राजकीय अर्थ सुद्धा काढू शकतात.

रोहित पवारांमध्ये आजोबांचा गुण

कारण रोहित पवार आणि जय शाह हे दोन भिन्न राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. राजकीय मतभिन्नता असली, तरी पक्षीय विरोध बाजूला ठेऊन चांगल्या कामाच कौतुक करण्याचा गुण त्यांच्यामध्ये आहे. शरद पवारांमध्येही हाच गुण आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. आपल्या आजोबांप्रमाणे रोहित पवारांमध्ये सुद्धा हाच गुण आहे.

कशामुळे मैत्रीचा धागा जोडला गेला?

रोहित पवार यांनी जय शाह यांचं कौतुक केलय, त्यांचे आभार मानलेत, यामागे कुठलं राजकीय कारण नाहीय. रोहित पवार आणि जय शाह यांना जोडणारा दुवा आहे, क्रिकेट. क्रिकेटमुळे या दोघांमध्ये मैत्रीचा धागा जोडला गेलाय.


शेड्युल जाहीर झालय

यंदा वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. फायनल 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे. काल वनडे वर्ल्ड कप 2023 च शेड्युल जाहीर झालं. त्यावेळी भारतात स्टेडियमची व्यवस्था असलेल्या अनेक शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने आयोजित करण्यात आले आहेत.

आभार मानण्यामागे कारण काय?

पुण्यातही वनडे वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. पुण्यात तब्बल 27 वर्षानंतर वर्ल्ड कपचे पाच सामने होणार आहेत. यासाठी रोहित पवार यांनी जय शाह यांचे आभार मानलते. रोहित पवार यांनी टि्वटमध्ये माझे मित्र म्हणत जय शाह यांचं कौतुक केलय.