ICC Ranking: पाकिस्तानी क्रिकेटपटूने Virat Kohli चं स्थान हिसकावलं, टेस्ट, वनडे, टी 20 मध्ये कोण नंबर 1? जाणून घ्या….

| Updated on: Jun 15, 2022 | 7:00 PM

ICC ची रँकिंग जाहीर झाली असून यात विराट कोहलीला (Virat kohli) मोठा झटका बसला आहे. बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीची वनडे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

ICC Ranking: पाकिस्तानी क्रिकेटपटूने Virat Kohli चं स्थान हिसकावलं, टेस्ट, वनडे, टी 20 मध्ये कोण नंबर 1? जाणून घ्या....
विराट कोहली
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई: ICC ची रँकिंग जाहीर झाली असून यात विराट कोहलीला (Virat kohli) मोठा झटका बसला आहे. बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीची वनडे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तानचा ओपनर इमाम उल हक दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीची मागच्या दोन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. त्याला अद्यापही सूर गवसलेला नाही. वनडे, टी 20 आणि कसोटी तिन्ही फॉर्मेटमध्ये तो शतकापासून वंचित आहे. आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने खूपच खराब प्रदर्शन केलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचा असाच फॉर्म कायम आहे. त्याचा फटका त्याला आज आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या रँकिंगमध्ये बसला आहे. विराट कोहलीची तिसऱ्या स्थानावर घसरण झालीय. वनडे क्रिकेटमध्ये बाबर आजम (babar Azam) अव्वल म्हणजे पहिल्या स्थानावर आहे.

जोश हेझलवूड नंबर 1

आयसीसीच्या टी 20 रँकिंगमध्ये जोश हेझलवूड पहिल्या स्थानावर आहे. 792 रेटिंग पॉइंट्ससह तो पहिल्या स्थानावर आहे. वनडेमध्ये हेझलवूड दुसऱ्या स्थानावर आहे. ट्रेंट बोल्ट पहिल्या नंबरवर कायम आहे. फलंदाजांच्या टी 20 रँकिंगमध्येही बाबर आजम पहिल्या स्थानावर कायम आहे.

दोन टेस्टमध्ये लागोपाठ दोन शतकं

कसोटी क्रमवारीबद्दल बोलायच झाल्यास जो रुट पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत त्याने दोन कसोटी सामन्यात दोन शतक झळकावली आहेत. रुटला त्याच्या या जबरदस्त प्रदर्शनाचा फायदा झाला आहे. त्याने मार्नस लाबुशेनकडून अव्वल स्थान हिरावून घेतलय.

जो रुटने सुनील गावस्करांना टाकलं मागे

जो रुट न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत चार डावात 101 पेक्षा जास्त सरासरीने 305 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 रन्सही पूर्ण केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांमध्ये तो सुनील गावस्करांच्या पुढे आहे.

इशान किशनची रँकिंगमध्ये मोठी झेप

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी 20 सीरीजमध्ये इशान किशन दमदार फलंदाजी करतोय. त्याने तीन पैकी दोन सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. याचा फायदा त्याला आयसीसी टी 20 रॅकिंगमध्ये झाला आहे. सध्या रँकिंगमध्ये तो 7 व्या नंबरवर पोहोचला आहे.

कसोटी, वनडे मध्ये कोण नंबर 1 ऑलराऊंडर?

रवींद्र जाडेजा कसोटीमध्ये नंबर 1 ऑलराऊंडर आहे. शाकीब हसन वनडे मध्ये नंबर 1 ऑलराऊंडर तर मोहम्मद नबी टी 20 मध्ये नंबर 1 ऑलराऊंडर आहे.