मुंबई : टी – 20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) एक चांगली बातमी समोर आली आहे. ही बातमी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी खूपच आनंद देणारी आहे, कारण, आयसीसी आणि स्पर्धेचे यजमान बीसीसीआयने स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे. याचा अर्थ असा की, टी -20 विश्वचषकाचे सामने शांततेत, प्रेक्षकांविना खेळवले जाणार नाहीत, तर स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळणार नाही. क्रिकेटचे वेड असलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, यूएई आणि ओमान येथे होणाऱ्या आयसीसी टी – 20 विश्वचषकातील सामन्यांच्या तिकिटांची विक्री कालपासून सुरु करण्यात आली होती. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की, तिकीटविक्रीसाठी विंडो ओपन होताच अवघ्या तासाभरात सर्व तिकीटं विकली गेली आहेत. 24 ऑक्टोबर रोजी खेळवल्या जाणाऱ्या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही तिकीटविक्री त्याचं प्रमाण आहे.
दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. या सामन्यासह, दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी या स्पर्धेतीत त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर, भारताचा संघ आजपर्यंत पाकिस्तानकडून कधीही हरला नाही आणि त्यांचा तोच विक्रम कायम राखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. टी – 20 कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा असेल. म्हणूनच, त्याने आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारण्यासाठी तयारी सुरु केली आहे. (ICC T20 World Cup 2021: India vs Pakistan Match Tickets Sold Out in Hour)
भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटच्या मैदानावरील महाभारताला सर्व सामन्यांपेक्षा विशेष मानलं जातं. चाहतेदेखील यासाठी खूप उत्सुक असतात. त्यांच्या उत्सुकतेचा यापेक्षा चांगला पुरावा काय असू शकतो की, आता वेबसाइटवर या सामन्याच्या तिकिटांचा दुष्काळ आहे. तिकिटांची विक्री सुरू होताच चाहत्यांमध्ये ती खरेदी करण्याची स्पर्धाच पाहायला मिळत होती. अवघ्या तासाभरात सर्व तिकिटे विकली गेली.
Was waiting for weeks to get my hands on #Pak v #Ind World Cup match ticket… they went on sale yesterday while we were busy with moving houses and got sold out in a few minutes ? anyone selling general category tickets here? #T20WorldCup #Dubai
— sarahrizvi (@sarahrizvi) October 4, 2021
ही माहिती शेअर करताना आयसीसीने म्हटले आहे की यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी – 20 विश्वचषकासाठी स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांना परवानगी असेल. यासह, तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटमध्ये सुपर 12 स्टेजचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. तर या स्पर्धेतील सर्वात हायप्रोफाईल सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकमेकांसमोर उभे असतील.
भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
इतर बातम्या
IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी उत्तम, पण कर्णधार धोनीच्या नावे खराब रेकॉर्ड
IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान
हैद्राबाद संघाची फलंदाजी सर्वात रटाळ, पाहताना झोप लागते, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा हल्लाबोल
(ICC T20 World Cup 2021: India vs Pakistan Match Tickets Sold Out in Hour)