मुंबई : गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव करून आयसीसी स्पर्धेतील भारताच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच आव्हान दिले होते. भारताकडे यावेळी सूड उगवण्याची संधी आहे. आयसीसीमुळे ही संधी भारताला मिळाली आहे. उभय संघांमधील सामन्याच्या तारखेवर आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ज्या दिवशी मैदान-ए-जंग असेल आणि क्रिकेटचा जल्लोष शिगेला असेल तो दिवस क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने (ICC) निश्चित केला आहे.
ICC ने T20 World Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यंदाचा टी-20 वर्ल्डकप (T-20 World cup) ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच (Australia) विद्यमान टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन आहे. प्रत्येक वर्ल्डकप स्पर्धेत कोट्यवधी चाहत्यांना प्रतीक्षा असते, ती भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची. 2022 वर्ल्डकप मध्येही भारत-पाकिस्तान भिडणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचे यजमानपद, यावेळी ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाईल, ज्यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानही याच 16 संघात असतील. चांगली गोष्ट अशी आहे की या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धेच्या पहिल्या फेरीत खेळण्याची गरज नाही कारण ते आधीच सुपर 12 साठी पात्र झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी सकाळी नवीन शेड्युलड जारी केलं. टी-20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सुपर-12 राऊंडची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होईल. सुपर-12 मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.
India and Pakistan meet at the #T20WorldCup again at the MCG in October ?
A look back at the previous meetings at the tournament ?https://t.co/sIamnyp0qA
— ICC (@ICC) January 21, 2022
T20 विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील ही सातवी लढत असेल. यापूर्वी झालेल्या 6 लढतींमध्ये भारताने 4 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने केवळ एकदाच विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांमधील एक सामना बरोबरीत सुटला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उभय संघांमधील हा पहिला सामना असेल. गेल्या 6 पैकी 5 सामने तटस्थ ठिकाणी झाले आहेत, ज्यात भारताने 3 जिंकले आहेत. म्हणजेच एकूणच वर्चस्व भारताचे आहे. मात्र या वर्चस्वाला पाकिस्तानने गेल्या वेळी विजयाचे बिगुल वाजवून आव्हान दिले आहे. त्यामुळे यावेळी टीम इंडियाला मागील चुकांना बगल देत मैदानात उतरावे लागणार आहे.
Australia lights up with the ICC Men’s @T20WorldCup fixture announcement? pic.twitter.com/4YAMEDrvS5
— ICC (@ICC) January 21, 2022
सुपर 12 मध्ये एकूण 12 संघ खेळताना दिसणार आहेत. या 12 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 8 संघांची नावे निश्चित झाली आहेत. तर उर्वरित 4 संघ पहिल्या फेरीच्या निकालानंतर निश्चित होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना गट 2 मध्ये स्थान मिळाले आहे. या व्यतिरिक्त या गटात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचे संघ आहेत.
इतर बातम्या
IND vs SA 2nd ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना
ICC T20 World Cup 2022 Full Schedule, know Ind vs Pakistan match date