ICC ODI World Cup Schedule : आज जाहीर होणार वर्ल्ड कप शेड्यूल, पाकिस्तानच्या मागण्यांना केराची टोपली?

| Updated on: Jun 27, 2023 | 8:17 AM

ICC ODI World Cup Schedule : ड्राफ्ट शेड्युलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना किती तारखेला आहे? पाकिस्तानच्या मागण्याची आयसीसी दखल घेणार की, धुडकावणार? ते आज समजेल.

ICC ODI World Cup Schedule : आज जाहीर होणार वर्ल्ड कप शेड्यूल, पाकिस्तानच्या मागण्यांना केराची टोपली?
ICC ODI World Cup 2023 Schedule ind vs pak
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई : भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. 2011 नंतर भारत पुन्हा एकदा वर्ल्ड कपच यजमानपद भूषवणार आहे. ICC ने अजूनपर्यंत या स्पर्धेच शेड्यूल जाहीर केलेलं नाही. सर्वचजण या वर्ल्ड कप शेड्यूलची वाट पाहतायत. शेड्युलवर खास करुन भारत-पाकिस्तान सामन्यासाठी नजर आहे. शेड्युलवरुनच भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? ते स्पष्ट होईल. आज मंगळवार 27 जून रोजी आयसीसीकडून वर्ल्ड कप शेड्यूलची घोषणा होऊ शकते.

वर्ल्ड कपचे आयोजक भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने काही दिवसांपूर्वी आयसीसीला ड्राफ्ट शेड्यूल पाठवून दिलं होतं. या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या टीम्सनाही वर्ल्ड कपच ड्राफ्ट शेड्यूल पाठवलं आहे. ड्राफ्ट शेड्यूलनुसार वर्ल्ड कपची सुरुवात पाच ऑक्टोबरला होईल आणि फायनल मॅच 19 नोव्हेंबरला खेळली जाईल. यावर फक्त आता आयसीसीकडून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. आयसीसी मंगळवारी आवश्यक बदल करुन शेड्युल जाहीर करु शकते.

पाकिस्तानला काय आक्षेप?

बीसीसीआयने जे शेड्युल आयसीसीला पाठवलं होतं, त्यावर पाकिस्तानला काही आक्षेप होते. बीसीसीआयने पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयोजित करण्याच ठरवलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानचा सामना बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तान विरुद्धचा सामना बंगळुरु आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना चेन्नईत खेळायचा आहे.

पाकिस्तानच्या मागण्या स्वीकारणार की, धुडकावणार ?

ड्राफ्ट शेड्यूलनुसार भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तानला त्यावर सुद्धा आक्षेप आहे. चेन्नई, कोलकाता किंवा बंगळुरुमध्ये हे सामने व्हावेत, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. आता पाकिस्तानच्या मागण्या आयसीसी स्वीकारणार की, धुडकावणार ते आज समजेल.


भारताचा पहिला सामना कोणाविरुद्ध ?

बीसीसीआयने जे ड्राफ्ट शेड्युल पाठवलय त्यानुसार, भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कपचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला होईल. भारताचे लीग सामने कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरूसह नऊ शहरात खेळवले जाणार आहेत.

दोन वर्ल्ड चॅम्पियन्स टीम खेळतायत क्वालिफायर

या वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 टीम्स सहभागी होणार आहेत. यात आठ टीम्स ठरलेल्या आहेत. उरलेल्या दोन टीम्स कुठल्या त्यासाठी क्वालिफायर टुर्नामेंट सुरु आहे. सध्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या वर्ल्ड चॅम्पियन्स टीम्सवर क्वालिफायरमध्ये खेळण्याची वेळ आली आहे.