U19 Final: ‘प्रत्येक प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर…’, शुभेच्छा देताना रोहित शर्मा म्हणाला…

| Updated on: Feb 05, 2022 | 5:39 PM

"मी बंगळुरुमध्ये त्यांच्यासोबत होतो. त्यांची मेहनत मी पाहिलीय. आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईला रवाना होण्याआधी त्यांनी मैदानावर खूप मेहनत केली"

U19 Final: प्रत्येक प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर..., शुभेच्छा देताना रोहित शर्मा म्हणाला...
Team India (फोटो- Cricket World Cup)
Follow us on

अहमदाबाद: भारताचा युवा संघ अंडर 19 वर्ल्डकपच्या (Under 19 world cup final) फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताचा आज इंग्लंड विरुद्ध (India vs England) अंतिम सामना होणार असून पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने यश धुलच्या (Yash dhull) नेतृत्वाखाली युवा संघ मैदानात उतरेल. या आधीच्या क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलचे सामने भारताने सहज जिंकले आहेत. अंतिम सामन्याआधी विराट कोहलीने अंडर 19 संघासोबत संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केलं. फायनलाआधी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनी अंडर 19 टीमचा उत्साह वाढवणारे, त्यांच्यात विश्वास निर्माण करणारे संदेश पाठवले आहेत. भारताच्या वनडे आणि टी-20 टीमचा कॅप्टन रोहित शर्माने सुद्धा युवा संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

“सर्वप्रथम अंतिम फेरीसाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. अंतिम फेरीत पोहोचण्याआधी या संघाने दमदार खेळ दाखवला आहे. त्यामुळे माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. मी बंगळुरुमध्ये त्यांच्यासोबत होतो. त्यांची मेहनत मी पाहिलीय. आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईला रवाना होण्याआधी त्यांनी मैदानावर खूप मेहनत केली आणि आता ते वर्ल्डकपमध्ये खेळत आहेत” असे रोहित शर्मा म्हणाला.

“वेगवेगळ्या प्रतिस्पर्धी संघांसोबत कसं खेळायचं, या बद्दल मी त्यांच्याशी संवाद साधला. कारण ज्यावेळी तुम्ही ICC स्पर्धांमध्ये खेळता, तेव्हा प्रत्येक प्रतिस्पर्धी वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर आव्हान निर्माण करु शकतो. त्यांनी त्यांच्या खेळाची कशी प्लानिंग केली पाहिजे, याबद्दल मी त्यांच्याशी बोललो. मैदानावर जाऊन तुम्ही त्या क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, कारण तुम्ही प्रत्येकवेळी फायनलमध्ये पोहोचत नाही. त्यामुळे ज्यावेळी तुमच्याकडे संधी आहे, तेव्हा आधी तिचा आनंद घ्या आणि नंतर सर्वोत्तम प्रदर्शन करा. आपल्याला वर्ल्डकप जिंकण्याची चांगली संधी आहे. माझ्याकडून संपूर्ण टीमला शुभेच्छा” असं रोहित म्हणाला.