ICC U19 World Cup : संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांचा दबदबा, प्रत्येक संघ 200 धावांच्या आत गुंडाळला
टीम इंडियाने फायनलपर्यंतचा प्रवास केला आणि यादरम्यान कोणत्याही संघाला आपले वर्चस्व निर्माण होऊ दिले नाही. संघाच्या फलंदाजांनी काही उत्कृष्ट खेळी खेळल्या, तर गोलंदाजांनी एक पाऊल पुढे जाऊन विरोधी फलंदाजांना प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
1 / 5
भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये (ICC under 19 world cup) वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा (Yash dhull) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला. . इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. सामन्यात एकवेळ भारताची चार बाद 97 अशी स्थिती होती. त्यावेळी ऑलराऊंडर निशांत सिंधू (Nishant sindhu - 50) आणि राज बावाने (35) पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. या सामन्याचा नायक ठरला तो राज बावा. पाच विकेट आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली.
2 / 5
भारतीय अंडर-19 क्रिकेट संघासाठी यंदाचा विश्वचषक हा खूप मोठा प्रवास ठरला आहे. टीम इंडियाने फायनलपर्यंतचा प्रवास केला आणि यादरम्यान कोणत्याही संघाला आपले वर्चस्व निर्माण होऊ दिले नाही. संघाच्या फलंदाजांनी काही उत्कृष्ट खेळी खेळल्या, तर गोलंदाजांनी एक पाऊल पुढे जाऊन विरोधी फलंदाजांना प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. परिस्थिती अशी होती की या स्पर्धेतील सर्व 6 सामन्यांमध्ये भारताने एकाही संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही. (Photo: Twitter/BCCI)
3 / 5
भारताने ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडाविरुद्ध सामने खेळले. त्यांच्या पहिल्याच सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 232 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 187 धावांत गुंडाळला होता. त्याचप्रमाणे आयर्लंडविरुद्ध 307 धावा केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ 133 धावांवर गारद केला. दुसरीकडे, भारताने युगांडाविरुद्ध 405 धावांची मोठी धावसंख्या उभारली, तर युगांडा 79 धावांवर गारद झाला. (Photo: Twitter/ICC)
4 / 5
ग्रुप स्टेजनंतर भारताची ही उत्कृष्ट कामगिरी बाद फेरीतही कायम राहिली. उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशला केवळ 111 धावांत गुंडाळलं आणि 5 गडी राखून विजय मिळवला. यानंतर उपांत्य फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना झाला, ज्यामध्ये भारताने 290 धावांची मजबूत धावसंख्या उभारली आणि ऑस्ट्रेलियाला 194 धावांवर रोखून अंतिम फेरीत धडक मारली. (Photo: Twitter/ICC)
5 / 5
भारतीय गोलंदाजांनी अंतिम फेरीतही असाच पराक्रम केला. फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडच्या बलाढ्य संघाशी झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली, पण त्याचा त्यांना फारसा उपयोग झाला नाही. राज अंगद बावाच्या 5 विकेट आणि रवी कुमारच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडला अवघ्या 189 धावांत गारद केले. (Photo: Twitter/BCCI & ECB)