IND vs IRE T20 WC : भारतीय महिला क्रिकेट टीमने सोमवारी T20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड विरुद्धचा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुइस पद्धतीने सामन्याचा निकाला लागला. भारताने हा सामना 5 धावांनी जिंकला. भारताने पहिली बॅटिंग केली. 6 विकेट गमावून 155 धावा केल्या. आयर्लंडच्या टीमने 8.2 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 54 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. भारतीय बॅट्समननी या सामन्यात आयरिश गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. पण फिल्डिंगमध्ये मात्र आयरिश टीमने मन जिंकलं. आयर्लंडच्या टीमने काही जबरदस्त झेल पकडले. या कॅच पाहून कौतुकाचे शब्द बाहेर पडतील.
शानदार कॅचने संपवला खेळ
आयर्लंड विरुद्ध भारतीच धावसंख्या हा या वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वाधिक स्कोर आहे. स्मृती मांधनाने या मॅचमध्ये शानदार बॅटिंग केली. तिने अर्धशतक फटकावलं. तिने 56 चेंडूत 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 87 धावा फटकावल्या. तिला पहिलं टी 20 शतक झळकवता आलं नाही. तिला सहकारी शेफाली वर्माकडून चांगली साथ मिळाली. पण एका शानदार कॅचने शेफालीचा खेळ संपवला.
शेफालीची शानदार कॅच
मांधना आणि शेफाली दोघी टीमसाठी सातत्याने धावा बनवत होत्या. धावफलकारवर 62 रन्स दिसत होत्या. 10 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शेफाली आऊट झाली. लॉरा डेलनीची गोलंदाजी सुरु होती. तिने लेग स्टम्पवर शेफालीला चेंडू टाकला. शेफालीने पुढे येऊन शॉट मारला. डीप स्क्वेयर लेगला हवेत फटका खेळला. एमी हंटर हवेत चेंडू पाहून त्या दिशेने पळाली. चेंडूपासून ती लांब होती. एमीने पुढच्या बाजूला डाइव्ह मारुन शेफालीचा अप्रतिम झेल घेतला. शेफालीने 29 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या.
मांधना-हरमनप्रीतची जोडी फुटली
शेफाली नंतर मांधना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरची जोडी आयर्लंडच्या अडचणी वाढवत होती. त्यांनी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती. त्याचवेळी एका शानदार कॅचमुळे ही जोडी फुटली. हरमनप्रीत पॅव्हेलियनमध्ये परतली. डेलनी 16 वी ओव्हर टाकत होती. तिने मिडल स्टम्पवर चेंडू टाकला. हरमनप्रीतने डीप मिडविकेटच्या दिशेला शॉट मारला. तिथे उभ्या असलेल्या ओर्ला प्रेनडेरगास्टने अप्रतिम झेल पकडला. तिने पुढे डाइव्ह मारुन सुंदर कॅच पकडली.
पुढच्याच चेंडूवर आयर्लंडला आणखी एक मोठा विकेट मिळाला. विकेटकीपर बॅट्समन ऋचा घोषने समोरच्या दिशेने शॉट मारला. तिथे उभी असलेली गॅबी लुइसने पळत जाऊन डाइव्ह मारुन कॅच घेतली. ऋचाची इनिंग संपली. पण डेलनीला हॅट्रिक घेता आली नाही.