मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women World Cup 2022) स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरला विश्वचषकासाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच रिचा घोष आणि तानिया भाटिया यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. जेमिमा रॉड्रिग्ज, शिखा पांडे, हरलीन देओल, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. जेमिमाची निवड न होणे हे सर्वात आश्चर्यकारक आहे. तिने अलीकडेच इंग्लंडमधील द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमध्ये चमकदार खेळ सादर केला होता. (ICC Women World Cup 2022 : Indian Squad announced, Jemimah Rodrigues-Shikha Pandey gets dropped)
तर सबीनीन मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर यांना स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. महिला विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना 6 मार्च 2022 रोजी पाकिस्तान विरुद्ध टॉरंगा येथे होणार आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननंतर भारताला न्यूझीलंड (10 मार्च), वेस्ट इंडिज (12 मार्च), इंग्लंड (16 मार्च), ऑस्ट्रेलिया (19 मार्च), बांगलादेश (22 मार्च) आणि दक्षिण आफ्रिका (27 मार्च) या संघांविरुद्ध खेळायचे आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. ही मालिका 11 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. यामध्ये पाच सामने होणार आहेत. वनडे मालिका 24 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. एक सामना नेपियरमध्ये आणि नेल्सन आणि क्वीन्सटाऊनमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळवले जातील.
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया. (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.
स्टँडबाय खेळाडू: सबीनीन मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर
#TeamIndia squad for ICC Women’s World Cup 2022 & New Zealand ODIs:
Mithali Raj (C), Harmanpreet Kaur (VC), Smriti, Shafali, Yastika, Deepti, Richa Ghosh (WK), Sneh Rana, Jhulan, Pooja, Meghna Singh, Renuka Singh Thakur, Taniya (WK), Rajeshwari, Poonam. #CWC22 #NZvIND pic.twitter.com/UvvDuAp4Jg
— BCCI Women (@BCCIWomen) January 6, 2022
न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला यजमान संघाविरुद्ध टी-20 सामनाही खेळायचा आहे. हा सामना 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी संघही जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली या सामन्यासाठी 16 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड. पूनम यादव, एकता बिश्त, एस. मेघना आणि सिमरन दिल बहादूर.
इतर बातम्या
कसोटीचा निकाल आज लागणार पण कोणाच्या बाजूने? भारतीय बॉलर्स ‘तो’ खतरनाक स्पेल टाकतील?
IPL 2022 च्या मेगा ऑक्शन संदर्भात येऊ शकते एक वाईट बातमी
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचं जोरदार प्रत्युत्तर, भारतीय गोलंदाज ठरले निष्प्रभ
(ICC Women World Cup 2022 : Indian Squad announced, Jemimah Rodrigues-Shikha Pandey gets dropped)