IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?
भारतीय महिला संघ शनिवारी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसरा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडनंतर टीम इंडियाचा सामना आता वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे.
1 / 5
भारतीय महिला संघ शनिवारी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसरा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडनंतर टीम इंडियाचा सामना आता वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
2 / 5
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्याच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यजमान न्यूझीलंडने मागच्या सामन्यात 62 धावांनी मात दिली होती. भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे.
3 / 5
भारतीय महिला संघ वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. एक सामना जिंकला तर दुसऱ्या मॅचमध्ये पराभव झाला आहे.
4 / 5
वर्ल्डकप बद्दल बोलायचं झाल्यास टीम इंडियाची बाजू वरचढ आहे. अजूनपर्यंत भारताचा वेस्ट इंडिजकडून कधीच पराभव झालेला नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्य़ंत सहा सामने झाले आहेत. हे सहाचे सहा सामने भारताने जिंकलेत.
5 / 5
पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 107 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.