मुंबई : टी-20 क्रिकेटमध्ये फ्रान्सच्या महिला संघाची (France Women Cricket Team) पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध (Ireland Women Cricket Team) महिला टी-20 विश्वचषकाच्या (Women T20 World Cup) पात्रता सामन्यात प्रथम फलंदाजी करताना फ्रान्सचा संपूर्ण संघ 24 धावांवर ऑल आऊट झाला. त्यांच्या एकाही फलंदाजाने दुहेरी धावसंख्या गाठणे तर दूरच कोणालाही अवघ्या 5 धावासुद्धा करता आल्या नाहीत. (ICC Women’s T20 World Cup Qualifier : Ireland women defeated France in just 16 balls)
फ्रान्सच्या संघांने 24 धावा केल्या मात्र त्यापैकी 13 धावा एक्स्ट्रा (वाईड, नो बॉल, लेग बाय) मिळाल्या. अन्यथा परिस्थिती आणखी बिकट झाली असती. त्यानंतर, आयर्लंडने फ्रान्सने दिलेले 25 धावांचे लक्ष्य अवघ्या 2.4 षटकांत म्हणजेच 16 चेंडूत पूर्ण केले आणि 10 गडी राखून विजय मिळवला. फ्रान्स महिला संघाने सलग तीन सामने गमावले असून हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. विशेष म्हणजे तिन्ही सामन्यांमध्ये या संघाला एकदाही 50 धावांचा पल्ला गाठता आलेला नाही. दुसरीकडे आयर्लंडच्या संघाने तीन पैकी दुसरा सामना जिंकला असून हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
आयर्डंने नाणेफेक जिंकून फ्रान्सच्या संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यानंतर प्रथम खेळताना फ्रान्सने सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट गमावली. पण ही फक्त विकेट पडण्याची सुरुवात होती. यानंतर फलंदाजांमध्ये बाद होण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. फ्रान्सच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी धावांच्या बाबतीत नव्हे तर चेंडूंच्या बाबतीत होती. या संघातील फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 24 चेंडूंची भागीदारी केली. मात्र, या काळात त्यांना केवळ तीनच धावा जोडता आल्या. फ्रान्सचे पाच फलंदाज खाते न उघडता बाद झाले.
फ्रान्सच्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ही 3 होती. जेनिफर किंग आणि ट्रेसी रॉड्रिग्ज या दोघींनी प्रत्येकी 3 धावांचे योगदान दिले. फ्रान्सच्या संघाने केलेल्या 24 धावांपैकी केवळ 11 धावा फलंदाजांनी केल्या. उर्वरित 13 धावा एक्स्ट्रामधून आल्या. यामध्ये 12 वाइडचा समावेश होता.
आयर्लंडकडून सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. पण सर्वात यशस्वी होती एमियर रिचर्डसन आणि लिया पॉल. रिचर्डसनने 2.1 षटके टाकली आणि दोन मेडनसह दोन विकेट घेतल्या. त्याचबरोबर पॉलने चार षटकांत पाच धावा देऊन दोन बळी घेतले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडने तिसऱ्या षटकातच यश मिळवले. रेबेका स्टॉकेल (7) आणि लुईस लिटल (12) धावांवर नाबाद राहिल्या.
हे ही वाचा :
तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार
(ICC Women’s T20 World Cup Qualifier : Ireland women defeated France in just 16 balls)