हॅमिल्टन: आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 (ICC Womens world cup 2022) स्पर्धेत भारत आज आपला दुसरा सामना खेळत आहे. न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टनमध्ये (India vs Newzeland) हा सामना सुरु आहे. भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात नऊ बाद 260 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून अमेलिया कार आणि एमीने शानदार खेळ दाखवला. कारने (50) तर एमीने (75) धावा केल्या. त्याशिवाय कॅटि मार्टिनच्या (41) आणि सोफिया डिवाइनच्या (35) धावा काढून चांगली साथ दिली. भारतासमोर आता विजयासाठी 261 धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून पूजा वस्त्राकार (Pooja Vastrakar) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 10 षटकात 34 धावा देत चार विकेट घेतल्या.
फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने दोन, झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतला. मागच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पूजा वस्त्राकारने महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. तिने अष्टपैलू खेळ दाखवला होता. आजही तिने तशीच कामगिरी केली. पाक विरुद्ध ऑलराऊंडर पूजा वस्त्रकारने 59 चेंडूत 67 धावांच्या खेळीत आठ चौकार फटकावले. तिच्या झंझावती फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
कडक फिल्डिंग
आज न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. नऊ धावांवर भारताला पहिलं यश मिळालं. कडक फिल्डिंगमुळे भारताला न्यूझीलंडची पहिली विकेट लवकर मिळाली. पूजा वस्त्रकरच्या शानदार थ्रो मुळे सूजी बेट्स अवघ्या पाच धावांवर रनआऊट झाली. त्यानंतर अमेलिया कर आणि सोफिया डिवाइनने डाव सावरला. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागदारी केली.
भारतीय संघात एक बदल
भारतीय संघाने या सामन्यात एक बदल केला आहे. खराब फॉर्ममुळे शेफाली वर्माला ड्रॉप करण्यात आलं आहे. न्यूझीलंडच्या टीमने संघात कोणताही बदल केलेला नाही. भारताने मागच्या सामन्यात पाकिस्तानवर 107 धावांनी मोठा विजय मिळवला होता. न्यूझीलंडचा भारताविरुद्ध तिसरा सामना आहे. आधी खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर दुसऱ्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
भारत प्लेइंग XI: स्मृति मानधना, यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्रकर, झूलन गोस्वामी
न्यूजीलंडची प्लेइंग XI: सोफिया डिवाइन, सूजी बेट्स, अमेलिया कर, एमी सैटर्थवेट, ली ताहुहू, मैडी ग्रीन, फ्रांसिस मॅके, कॅटे मार्टिन, जेस कर, हना रोव, हॅले येनसेन