आयसीसी महिला विश्वचषकाचा (ICC Women’s world cup 2022) 18वा सामना आज ऑकलंडमध्ये (Auckland) होणार आहे. भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (Australia) यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सलग चार सामने जिंकून मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने (Indian Team) चारपैकी दोन सामने जिंकले आणि दोन सामने गमावले आहे. भारतीय संघापुढे आपली विश्वचषक मोहीम पुन्हा रुळावर आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाची घोडदौड रोखण्याचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ सर्व खेळलेले चार सामने जिंकून विजयरथावर स्वार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला रोखण्याची भारतीय महिला संघाला आज संधी आहे. अनुभवी मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नसल्याने भारतीय महिला संघाचा मार्ग सोपा नाही आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.
भारतीय महिला संघाचा मागच्या सामन्यात इंग्लंडकडून 4 गडी राखून पराभव झाला होता. त्यामुळे मिताली राज आणि टीम हा पराभव विसरून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामने जिंकले आहे. तर 2 सामन्यात भारत पराभूत झाला आहे. टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र, पुढच्याच सामन्यात यजमान न्यूझीलंडने त्यांचा 62 धावांनी पराभव केला. यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत वेस्ट इंडिजचा 155 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजसमोर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळी करून पुन्हा एकदा यश मिळण्याचं आव्हान असणार आहे. मितालीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1 हजार 55 धावा केल्या आहे. गेल्या चारही सामन्यात मिताली बॅटने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे. आता यामुळे इतर खेळाडूंवर दबाव वाढला आहे. अशा परिस्थतीत मितालीसमोर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळी करुन जिंकण्याचं मोठ आव्हान असणार आहे. तर स्मृती मंधाना यंदा विश्वचषक सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-पाच पैकी एक आहे. स्मृतीने आतापर्यंत चार सामन्यात 216 धावा केल्यायेत. दुसरीकडे अष्टपैलू हरमनप्रीत कौरने आतापर्यंत सातत्याने प्रभावी खेळ करू शकलेली नाही. तरीही संघाला तिच्याकडून 2017 विश्वचषक सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. आता बोलून झुलन गोस्वामी या अनुभवी गोलंदाजविषयी. झुलनने आतापर्यंत सर्व चार सामने खेळले असून तिने 5 विकेट घेतल्या आहेत. झुलन ही आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. त्यामुळे तिच्यासमोर साजेसा खेळ करण्याचं आव्हान आहे.
इतर बातम्या