अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 70 धावांनी मात करत फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहली याने सामन्यात शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड केला. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक करत सचिन तेंडुलकर याचा विश्व विक्रम ब्रेक केला. त्यानंतर आता विराटला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये आणखी एक रेकॉर्ड उध्वस्त करण्याची संधी आहे. विराटला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
विराटला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होण्याची संधी आहे. सध्या हा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. विराटला रिकी पॉन्टिंगला मागे टाकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये कोहलीला विराट कामगिरीची करण्याची संधी आहे. विराटच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये 1 हजार 744 धावा आहेत. तर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नाववर आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांच्या टॉप 4 फलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या दोघांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकर : 2 हजार 278 धावा.
रिकी पॉन्टिंग : 1 हजार 743 धावा.
विराट कोहली : 1 हजार 743 धावा.
कुमार संगकारा : 1 हजार 535 धावा.
दरम्यान विराट कोहली या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने वर्ल्ड कपमधील 10 सामन्यांमध्ये 711 धावा केल्या. या 10 सामन्यांमध्ये विराटने 8 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावली. त्यामुळे विराटकडून क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात मोठ्या आणि तडाखेदार बॅटिंगची अपेक्षा आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.