मुंबई : ICC World Cup 2023 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला. टीमने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाच्या विजयाच सर्वाधिक श्रेय मोहम्मद शमीला दिलं जातय. न्यूझीलंडच्या टीमने या मॅचमध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. लढत दिली. पण टीम इंडिया विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरलेली. खासकरुन मोहम्मद शमीच्या आग ओकणाऱ्या चेंडूंनी न्यूझीलंडची वाट लावली. 33 वर्षाच्या शमीने 7 विकेट घेतले. वनडे वर्ल्ड कपमध्ये कुठल्याही भारतीय गोलंदाजाच हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.
सोशल मीडियावर एका युजरने दावा केलाय की, मॅचच्या एकदिवस आधीच मोहम्मद शमी 7 विकेट घेणार हे मला स्वप्नात दिसलं होतं. X वर ही भविष्यवाणी व्हायरल झालीय. त्यावर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. डॉन माटेओ नावाच्या एका युजरने सेमीफायनल मॅचच्या एकदिवस आधी 14 नोव्हेंबरला पोस्ट शेअर केली. ‘मी एक स्वप्न पाहिलं, त्यात शमीने सेमीफायनल मॅचमध्ये 7 विकेट घेतलेत’ असं या युजरने X वर लिहिलं होतं. डॉन माटेओच्या पोस्टला सुरुवातीला कोणी गांभीर्याने घेतलं नाही. पण विराट कोहलीच शतक आणि मोहम्मद शमीने 7 विकेट काढल्यानंतर आता या पोस्टची चर्चा सुरु झालीय.
Saw a dream where Shami took 7 wickets in the semi final ☠️
— Don Mateo (@DonMateo_X14) November 14, 2023
याच युजरने आता दुसरं टि्वट काय केलय?
X वर आतापर्यंत 1.7 मिलियन युजर्सनी ही पोस्ट पाहिलीय, त्यावर सतत Reactions येत आहेत. 19 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलसाठी पण अशीच भविष्यवाणी करं, असं डॉन माटेओला सगळे सल्ला देत आहेत. या भविष्यवाणीनंतर डॉन माटेओवर प्रश्नांचा पाऊस पडतोय. फायनल कोण जिंकणार इथपासून ते अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? असे प्रश्न त्याला विचारले जात आहेत. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर माटेओने पुन्हा एकदा टि्वट करुन मलाच आश्चर्याचा धक्का बसलाय असं सांगितलय. 9.5 ओव्हर्समध्ये शमीने 57 धावा देऊन 7 विकेट काढल्या.