मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंड संघाकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला आणि भारताचे पहिला वहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचे स्वप्नही अधुरे राहिले. पण म्हणतात ना ‘शो मस्ट गो ऑन.’ त्याप्रमाणेच आयसीसीने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचे (ICC WTC23) वेळापत्रक नुकतेच जाहिर केले असून भारताला पुन्हा एकदा जगज्जेता होण्याची संधी मिळणार आहे. आयसीसीने दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक आणि गुणपद्धती बुधवारी ट्विट करत जाहीर केली.
या स्पर्धेत भारताची सुरुवात 4 ऑगस्टपासून होणार आहे. भारतीय संघ सध्या इंग्ंलडच्या दौऱ्यावर असून त्याठिकाणी 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सुरुवातीचा सामना 4 ते 8 ऑगस्टच्या दरम्यान ट्रेंट ब्रिज याठिकाणाी होईल त्यानंतर 12 ते 16 ऑगस्टदरम्यान क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा सामना खेळवला जाईल. ज्यानंतर 25 ते 29 ऑगस्ट हेडिंग्ले येथे आणि 2 ते 6 सप्टेंबर ओव्हलमध्ये तिसरा आणि चौथा सामना खेळवला जाईल, मालिकेतील अखेरचा सामना 10 ते 14 सप्टेंबरदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येईल.
या संपूर्ण वेळापत्रकात सर्वाधिक सामने इंग्लंडचा संघ खेळणार आहे तर सर्वात कमी सामने बांग्लादेशचा संघ खेळेल. त्यामुळे गुणांतील फरक टाळण्यासाठी सर्व सामन्यांना आयसीसीने समान गुण दिले आहेत. त्यानुसार सामना विजयी झाल्यास 12 गुण आणि टाय झाल्यास दोन्ही संघाना प्रत्येकी 6 गुण दिले जातील, तसेच सामना ड्रॉ झाल्यास दोन्ही संघाना 4-4 गुण दिले जातील. या गुणांची टक्केवारीही काढली जाणार आहे. त्यानुसार 12 गुणांना100 टक्के, 6 गुणांना 50 टक्के आणि 4 गुणांना 33.33 टक्के दिले जाणार आहेत. मालिका विजयाचे गुणही ठरले असून दोन सामन्यांची मालिका 24, तिन सामन्यांची मालिका 36, चार सामन्याची मालिका 48 आणि पाच सामन्यांची मालिका 60 गुणांची असेल.
? 12 points available every match, irrespective of series length
? Teams to be ranked on percentage of points wonThe new points system for #WTC23 is revealed ? pic.twitter.com/9IglLPKRa1
— ICC (@ICC) July 14, 2021
भारतीय संघ या पर्वात 6 देशांशी भिडणार आहे. यामध्ये सुरुवात इंग्ंलडपासून होणार आहे. इंग्लंडशी त्यांच्याच भूमित भिडणारा भारतीय संघ बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका संघाचाही दौरा करणार आहे. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध घरच्या मैदानात कसोटी मालिका खेळणार आहे.
Some cracking fixtures to look out for in the next edition of the ICC World Test Championship ?
The #WTC23 schedule ? pic.twitter.com/YXzu5lS0t1
— ICC (@ICC) July 14, 2021
हे ही वाचा :
India W vs England W, 3rd T20 live streaming: भारत विरुद्ध इंग्लंड, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
(ICC WTC23 Scheduled Announced by ICC Know Team Indias Fixtures for World Test Championship 2021-23)