टीम इंडियाच्या कामगिरीवर कपिल देव निराश, BCCI ला दिला सल्ला, म्हणाले बडे खेळाडू परफॉर्म करत नसतील तर…

| Updated on: Nov 03, 2021 | 4:55 PM

टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषकातील आतापर्यंतच्या कामगिरीमुळे चाहते तसेच दिग्गज माजी खेळाडूदेखील निराश झाले आहेत. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

टीम इंडियाच्या कामगिरीवर कपिल देव निराश, BCCI ला दिला सल्ला, म्हणाले बडे खेळाडू परफॉर्म करत नसतील तर...
Kapil Dev
Follow us on

मुंबई : टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषकातील आतापर्यंतच्या कामगिरीमुळे चाहते तसेच दिग्गज माजी खेळाडूदेखील निराश झाले आहेत. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सलग दोन पराभवानंतर टीम इंडियाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आता जर संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर तिन्ही सामने जिंकण्याबरोबरच इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. (‘If big names don’t perform and play such bad cricket, BCCI needs to intervene’: Kapil Dev)

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी ही परिस्थिती लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. कपिल देव यांच्या म्हणण्यानुसार, टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू जर चांगला खेळ दाखवत नसतील तर बीसीसीआयने हस्तक्षेप करायला हवा. ते म्हणाले की, मोठ्या नावांवर अवलंबून न राहता बीसीसीआयने युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्याव्यात.

कपिल देव यांची बीसीसीआयला हस्तक्षेप करण्याची सूचना

देशाला पहिल्यांदा विश्वविजेता बनवणारा हा खेळाडू म्हणाला, ‘अन्य काही संघांच्या जोरावर आपण यशस्वी झालो, तर ही कौतुक करण्यालायक गोष्ट नाही. तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल किंवा उपांत्य फेरी गाठायची असेल, तर तुम्हाला ते स्वबळावर करावे लागेल. इतर संघांवर अवलंबून न राहणे चांगले. मला वाटते की निवडकर्त्यांना मोठी नावे आणि मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवावे लागेल.

कपिल देव पुढे म्हणाले की, ‘बीसीसीआयने विचार करण्याची गरज आहे की, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे का? आपण पुढची पिढी कशी चांगली बनवू शकतो? ते हरले तर त्यात काही गैर नाही. कारण त्यांना अनुभव मिळेल. बड्या खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दिला नाही, ते असेच वाईट क्रिकेट खेळत राहिले तर त्यावर बरीच टीका होणार आहे. मला वाटते की, बीसीसीआयने हस्तक्षेप करून आणखी तरुणांना संघात आणण्याचा विचार केला पाहिजे.

भारत अफगाणिस्तानवर अवलंबून

भारत अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. आज त्यांना अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. भारताला अजून तीन सामने खेळायचे आहेत. भारताने तिन्ही सामने जिंकले तरी त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल कारण न्यूझीलंडनेही तिन्ही सामने जिंकले तर भारतीय संघ आपोआप बाद होईल. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले आणि त्यानंतर भारताने त्यांचे सर्व सामने जिंकले तर भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व संघ सहा गुणांवर असतील आणि त्यानंतर सर्व काही निव्वळ धावगती निश्चित करेल.

इतर बातम्या

T20 World Cup India vs Afghanistan live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना

T20 World Cup 2021: आधी सामन्यात पराभूत केल्यानंतर आता विराटच्या मोठ्या रेकॉर्डलाही बाबरची गवासणी, नामिबियाविरुद्ध विक्रमाची नोंद

2007 वर्ल्ड कपमध्येही भारताने 2 चुका केल्या, त्याच चुका आताही, रोहितला ओपनिंग करु न दिल्याने वीरेंद्र सेहवाग भडकला

(‘If big names don’t perform and play such bad cricket, BCCI needs to intervene’: Kapil Dev)