लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील लॉर्ड्स कसोटीत (Lord’s Test) भारताने दमदार असा 151 धावांच्या फरकाने विजय मिळवला. यावेळी भारताचा सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) ऐतिहासिक शतकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याच्या या महत्त्वाच्या खेळीमुळे सामन्यात भारताने विजयाचा पाया रचला होता. विजयानंतर राहुलने इंग्लंड संघासह जागतिक क्रिकेटला जणू एक इशारा दिला. राहुल म्हणाला, ”भारतीय संघाला कोणी मैदानात त्रास देत असेल. तर भारतही मागे हटणार नाही. संघातील एका खेळाडूला जरी त्रास दिला, तर आम्ही सर्व 11 मिळून समोरच्याला सोडणार नाही.”
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना जितका खेळाच्या दृष्टीने चुरशीचा झाला तितकाच मैदानावरील वादांमुळेही रंगला. कधी कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन, कधी बटलर विरुद्ध बुमराह अशा एक न अनेक वादांमुळे सामना चांगलाच चुरशीचा झाला. भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी करणारा मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने 4 विकेट्स घेण्यासह मैदानातही आपल्या डॅशिंग अवतारात दिसला.
इंग्लंडने प्रथम गोलंदाजी घेतल्यामुळे भारताकडून रोहित आणि राहुलची जोडी सलामीसाठी उतरली. दोघांनी भारताला एक चांगली सुरुवात करुन दिली. ज्यामध्ये रोहित शतकापासून हुकला. पण राहुलने मात्र 250 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकारासह 129 धावा लगावत लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर स्वत:च नाव कोरलं. त्याच्या या कामगिरीनेच भारताला सामन्यात एक चांगली आघाडी मिळवून दिली होती. ज्यामुळे पुढील खेळात काहीसा दिलासा भारताकडे होते. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तसंच सामन्यानंतर बोलताना राहुलने सांगितले, ”लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर त्याचं लिहिलेलं नाव मी दररोज पाहतो. ते पाहून मला खूप आनंद मिळतो. भविष्यतही अशीच कामगिरी करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.”
For his majestic 1st innings ton at Lord’s ?️ @klrahul11 is our Man of the Match for the second Test ?#TeamIndia ?? | #ENGvIND
Scorecard ? https://t.co/KGM2YELLde pic.twitter.com/labkZwGgUl
— BCCI (@BCCI) August 16, 2021
इतर बातम्या
IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO
India vs England : सिराजची खुन्नस, कोहलीची आक्रमकता, टीम इंडियाच्या विजयाचे 8 फोटो
(If You Go After One Of Our Guys All 11 Will Come Right Back KL rahul says after lords test Win)