मुंबई : आयपीएल 2022 मध्ये रिटेन झालेल्या खेळाडुंना तगडी रक्कम मिळणार आहे. किग्ज इलेव्हन पंजाबन एक मोठा निर्णय घेतला आहे. मात्र या खेळाडुला रिटेन न झाल्याचाही मोठा फायदा होणार आहे. कारण त्याला दुसरी टीम तगडी रक्कम देण्यासाठी तयार असणार आहे. त्यासाठी आधीपासूनच गळ लावण्याची तयारी सुरू झाली होती. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या पसंतीनं रिटेन होणाऱ्या खेळाडुंना 16 कोटी रुपये एवढी तगडी रक्कम मिळणार आहे.
के. एल. राहुलला 20 कोटी मिळणार?
किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्टार फलंदाज आणि कर्णधार के. एल. राहुलला पंजाब टीमने रिटेन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचा राहुलला तगडा फायदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राहुलला दुसरी टीम एका सीझनसाठी तब्बल 20 कोटी रुपये देण्यास तयार असल्याची शक्यता आहे. राहुलला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी नवी येणारी लखनऊची टीम धडपडत असल्याच्या तक्रारी बीसीसीआयला प्राप्त झाल्या आहेत. किंग्ज 11 पंजाबने राहुलला मागच्या सीझनमध्ये त्यांच्याकडून खेळण्यासाठी 11 कोटी रुपये दिले होते. ती रक्कम आता थेट 20 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
राहुल सर्वात महागडा खेळाडू होणार?
20 कोटींची रक्कम घेऊन राहुल आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होण्याची शक्यता आहे. लखनऊ आतापर्यंतची आयपीएलमधील सर्वात माहगडी टीम आहे. या टीमला संजीव गोयंका यांच्या ग्रुपने 7090 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. राहुलने मागच्या तीन आयपीएल सीझनमध्ये 600 पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. टीम इंडियासाठीही त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे राहुलचा चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये राहुलचा भाव चांगलाच वाढला आहे.